भारतीय संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. आता त्याने कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतकही झळकावले आहे. नितीशने मेलबर्न कसोटीत ८१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
वास्तविक, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून BGT चा चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. २१ वर्षीय युवा भारतीय अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी याने या मालिकेतून कसोटी पदार्पण केले. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतच त्याने पदार्पण केले.
त्यानंतर नितीशने संपूर्ण मालिकेत आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. नितीशने मेलबर्न कसोटीपूर्वी तीनवेळा ४० प्लस स्कोअर केला, पण त्याला पहिले अर्धशतक झळकावता आले नव्हते. मात्र, आता त्याने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.
नितीश रेड्डीने पहिल्या डावात ८१ चेंडू खेळून आपले अर्धशतक पूर्ण केले. एवढेच नाही तर वृत्त लिहेपर्यंत तो अजूनही नाबाद असून ९४ चेंडूत ६२ धावांवर फलंदाजी करत आहे. रेड्डीनेही आतापर्यंतच्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार मारला आहे.
भारताने फॉलोऑन टाळला असून सध्या वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी फलंदाजी करत आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचे दोन सर्वात मोठे सुपरस्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची बॅट पूर्णपणे शांत आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू सतत संघर्ष करत आहेत.
विराट आणि रोहित करिअरच्या अंतिम टप्प्यात आहेत. हे दोन्ही फलंदाज गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नसल्यामुळे ही संघासाठी चिंतेची बाब आहे. कोहली आणि रोहित मेलबर्न कसोटीतही अपयशी ठरले. रोहित शर्मा अवघ्या ३ धावा करून बाद झाला. तर विराट कोहलीने सेट झाल्यानंतर ३६ धावांवर आपली विकेट गमावली.
बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो खूप प्रभावी ठरला. यजमान संघाने प्रथम फलंदाजी करताना ४७४ धावा ठोकल्या. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक १४० धावा केल्या.
याशिवाय मार्नस लॅबुशेनने ७२ धावांची, सॅम कॉन्स्टन्सने ६० धावांची तर उस्मान ख्वाजाने ५७ धावांची चांगली खेळी खेळली.
संबंधित बातम्या