Nitish Kumar Reddy Net Worth : नितीश कुमार रेड्डी हा सध्या प्रचंड चर्चेत आहे, आणि का नसावा, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याने मेलबर्नमध्ये दमदार फलंदाजी केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२८ डिसेंबर) अष्टपैलू नितीश रेड्डीने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले.
नितीश रेड्डीचे करिअरचे पहिले शतक खूप खास आहे कारण तो जेव्हा क्रीझवर आला तेव्हा भारताला फॉलोऑनचा धोका होता, पण त्याच्या खेळीने त्यावर मात करण्याचे काम केले. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या नितीश रेड्डी याची एकूण संपत्ती आता कोट्यवधींमध्ये आहे, त्याच्याकडे महागड्या कार आणि बाइक्सचे कलेक्शन आहे.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे टीम इंडियाचा हिरो बनलेल्या नितीश कुमार रेड्डी याचा जन्म २६ मे २००३ रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झाला. त्याचे वडील हिंदुस्थान झिंक कंपनीत काम करायचे.
पण मुलाचे स्वप्न पहिल्यापासूनच क्रिकेटर बनण्याचे होते, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरीही सोडली आणि वडिलांच्या आणि मेहनतीच्या जोरावर नितीश रेड्डी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री केली. आता त्याने कसोटी पदार्पणातच धूमाकूळ घातला आहे.
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नितीश कुमार रेड्डी याला सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पण आज त्याच्याकडे करोडोंची संपत्ती आहे.
टीम इंडियाच्या वतीने सर्व फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नितीश रेड्डी याला आयपीएलमधून कोट्यवधी रुपयांचे मानधनही मिळाले आहे. नितीश रेड्डी यांची एकूण संपत्ती ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
त्याने २०२३ मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश केला आणि सनरायझर्स हैदराबादने त्याला २० लाख रुपयांना खरेदी केले होते, परंतु आयपीएल २०२५ मध्ये त्याच्या संघाने त्याला ६कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत रिटेन केले आहे.
नितीश कुमार रेड्डी याला कार आणि बाइक्सची खूप आवड आहे आणि त्याचे कलेक्शनही अप्रतिम आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा हायराइडरसह इतर कारचा समावेश आहे. याशिवाय त्याच्या बाईक कलेक्शनमध्ये BMW G 310 GS आणि Jawa 42 यांचा समावेश आहे.
मेलबर्न कसोटीतील त्याची स्फोटक खेळी पाहिली तर नितीश कुमार रेड्डीने १७१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने १० चौकार आणि १ षटकार लगावला. छोट्याशा कसोटी कारकिर्दीतील हे पहिले शतक होते.
नितीश मैदानात उतरला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या ६ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावा होती, पण नितीशने वॉशिंग्टन सुंदरसोबत आठव्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी करून फॉलोऑनचा धोका टाळला.
संबंधित बातम्या