S Sajana Mumbai Indians, wpl 2024: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. प्लेऑफमध्ये मुंबईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ १५ मार्चला अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील.
त्याआधी मुंबई इंडियन्सचा शेवटचा साखळी सामनाही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झाला होता. या सामन्यात मुंबईचा दारूण पराभव झाला.
पण, या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी खेळाडू एस सजनाबाबत वक्तव्य केले. यानंतर नीता अंबानी यांचे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सजीवन सजना ही महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची ऑलराउंडर आहे. सजनाने WPL 2024 च्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून मुंबई इंडियन्सला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता.
दरम्यान, एस सजनाचा इथवर पोहोचण्याचा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला होता. खरं तर या तिची स्टोरी कोणत्याही बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर नीता अंबानी म्हणाल्या होत्या की, एस सजना ही पॉलिटिकल सायन्समध्ये पदवीधर आहे, तिचे वडील ऑटो ड्रायव्हर आहेत, पण असे असूनही तिने क्रिकेटची निवड केली.
नीता अंबानी पुढे म्हणतात की मला आशा आहे, की सजीवन सजना इतर मुलींसाठी एक उदाहरण बनेल. तसेच, पालक आपल्या मुलींना त्यांच्या आवडीचे करिअर निवडण्याची संधी देतील. महिला प्रीमियर लीग हे कोणत्याही खेळातील मुलींसाठी उत्तम उदाहरण असल्याचेही नीता अंबानींनी सांगितले.
संबंधित बातम्या