T20 World Cup : संथ फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला कर्णधारानं परत बोलावलं, वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच ‘रिटायर्ड आऊट’!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup : संथ फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला कर्णधारानं परत बोलावलं, वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच ‘रिटायर्ड आऊट’!

T20 World Cup : संथ फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला कर्णधारानं परत बोलावलं, वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच ‘रिटायर्ड आऊट’!

Jun 16, 2024 01:48 PM IST

Nikolaas Davin Retire Out : टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात कधीही न घडलेली ही घटना इंग्लंड आणि नामिबिया यांच्यातील सामन्यादरम्यान घडली. नामिबियाच्या एका खेळाडूच्या निर्णयामुळे इतिहास रचला घडला आहे.

T20 World Cup : संथ फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला कर्णधारानं परत बोलावलं, वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच ‘रिटायर्ड आऊट’!
T20 World Cup : संथ फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला कर्णधारानं परत बोलावलं, वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच ‘रिटायर्ड आऊट’!

nikolaas davin retired out : टी-20 विश्वचषक २०२४ चा ३४ वा सामना (१६ जून) इंग्लंड आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेला हा सामना पावसामुळे फक्त १०-१० षटकांचा खेळवण्यात आला. 

या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा ४१ धावांनी पराभव केला. पण या सामन्यात असे काही घडले जे आजपर्यंत T20 विश्वचषकाच्या इतिहासात कधीही घडले नव्हते. नामिबियाचा फलंदाज निकोलास डेव्हिन रिटायर्ड आऊट झाला.

या कारणामुळे निकोलस डेव्हिन रिटायर्ड आऊट झाला

निकोलस डेव्हाईन हा T20 विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला जो "रिटायर्ड आऊट" झाला. २६ वर्षीय निकोलस डेव्हिन टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये चौथा सामना खेळत होता. १० षटकांत १२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना निकोलस डेव्हिन याने संथ फलंदाजी केली. पहिल्या १६ चेंडूत त्याने केवळ १८ धावा केल्या आणि केवळ २ चौकार मारता आले.

अशा परिस्थितीत संघाने अनोखे पाऊल उचलत संघर्ष करणाऱ्या निकोलस डेव्हिन याला रिटायर्ड आऊट केले. सहाव्या षटकाच्या शेवटी तो रिटायर्ड आऊट झाला आणि त्याच्या जागी डेव्हिड व्हीजा मैदानावर आला.

यानंतर व्हीजेने अवघ्या १२ चेंडूत २७ धावा करून धमाका केला. जर डेव्हिन याला लवकर रिटायर्ड आऊट केले असते, तर नामिबियाला हा सामना जिंकता आला असता.

दरम्यान, नामिबियाला हा सामना जिंकता आला नसला तरी डेव्हिनला रिटायर्ड आऊट करण्याची रणनीती चांगलीच चर्चेत आली आहे. 

रिटायर्ड आऊट होण्याचा नियम काय आहे?

"रिटायर्ड हर्ट" च्या विपरीत, "रिटायर्ड आऊट" झाल्यानंतर, फलंदाज पुन्हा फलंदाजीला परत येऊ शकत नाही. MCC नियम २५.४.३ नुसार - "जर एखादा फलंदाज आजारपण, दुखापत किंवा इतर कारणास्तव रिटायर्ड आऊट झाला तर त्याचा डाव केवळ विरोधी कर्णधाराच्या संमतीनेच पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. 

इंग्लंड सुपर-८ मध्ये

इंग्लंड क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकाच्या सुपर ८ साठी पात्र ठरला आहे. रविवारी ऑस्ट्रेलिया स्कॉटलंड यांच्यात सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय संपादन केला. त्यांच्या विजयासह इंग्लंड सुपर ८ साठी पात्र ठरला. आता येथे त्यांचा सामना दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिजशी होणार आहे. इंग्लंडचा पहिला सुपर ८ सामना वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. हा सामना २० जून रोजी होणार आहे.

इंग्लंड टी-20 विश्वचषक २०२४ च्या ब गटात आहे. या गटातून ऑस्ट्रेलिया आधीच पात्र ठरला होता. यानंतर इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात चुरस रंगली होती. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्कॉटलंडला पराभवावाचा सामना करावा लागला. त्यामुळे स्कॉटलंड आता वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या