Women's T20 WC : न्यूझीलंडने पहिल्यांदाच जिंकला महिला T20 विश्वचषक, 'चोकर्स' दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न पुन्हा भंगले
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Women's T20 WC : न्यूझीलंडने पहिल्यांदाच जिंकला महिला T20 विश्वचषक, 'चोकर्स' दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न पुन्हा भंगले

Women's T20 WC : न्यूझीलंडने पहिल्यांदाच जिंकला महिला T20 विश्वचषक, 'चोकर्स' दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न पुन्हा भंगले

Oct 20, 2024 11:07 PM IST

न्यूजीलैंड ने पहली बार जीता महिला टी20 वर्ल्ड कप, 'चोकर्स' साउथ अफ्रीका का सपना फिर टूटा https://www.aajtak.in/sports/cr

न्यूझीलंडने पहिल्यांदाच जिंकला महिला T20 विश्वचषक, 'चोकर्स' दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न पुन्हा भंगले
न्यूझीलंडने पहिल्यांदाच जिंकला महिला T20 विश्वचषक, 'चोकर्स' दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न पुन्हा भंगले (REUTERS)

NZ vs SA Women's T20 World Cup 2024 : महिला 'टी-20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ३२ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.

आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ २० षटकात ९ बाद १२६ धावाच करू शकला.

न्यूझीलंडने पहिल्यांदाच महिला टी-20 वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगले. न्यूझीलंडच्या विजयात अमेलिया केरने महत्त्वाची भूमिका बजावली.   केरने फलंदाजी करताना ४३ धावा केल्या आणि त्यानंतर ३ बळीही आपल्या नावावर केले.

आफ्रिकन संघानं सलग दुसरी फानयल गमावली

न्यूझीलंडचा संघ तिसऱ्यांदा महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ सलग दुसरा फायनल खेळत होता, पण यावेळीही त्यांची निराशा झाली. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे कर्णधारपद सोफी डिव्हाईन सांभाळत होती. तर लॉरा वूलवर्ड दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करत होती.

सुरुवात चांगली पण मधल्या फळीने नांगी टाकली

अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६.५ षटकांत ५१ धावा जोडल्या.

मात्र, सलामीची भागीदारी तुटताच दक्षिण आफ्रिकेचा संघ दडपणाखाली आला आणि ठराविक अंतराने विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून कर्णधार वोल्वार्डने सर्वाधिक ३३ धावांची खेळी खेळली.

तर ताजमिन ब्रिट्सने १७ आणि क्लो ट्रायॉनने १४ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून अमेलिया केर आणि रोझमेरी मायरने प्रत्येकी ३ बळी घेतले.

न्यूझीलंडचा डाव

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून अमेलिया केरने सर्वाधिक ४३ धावा केल्या. केरने ३८ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार मारले. तर ब्रूक हॅलिडेने २८ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या.

हॅलिडे आणि केर यांच्यात चौथ्या विकेटसाठी ४४ चेंडूत ५७ धावांची भागीदारी झाली. तर सलामीची फलंदाज सुझी बेट्स हिनेही ३२ धावांची उपयुक्त खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून एन म्लाबाने २ बळी घेतले.

Whats_app_banner