NZ vs ENG : ग्लेन फिलिप्सनं हे काय करून दाखवलं, असा झेल तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल! व्हिडीओ पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  NZ vs ENG : ग्लेन फिलिप्सनं हे काय करून दाखवलं, असा झेल तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल! व्हिडीओ पाहा

NZ vs ENG : ग्लेन फिलिप्सनं हे काय करून दाखवलं, असा झेल तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल! व्हिडीओ पाहा

Published Nov 29, 2024 01:49 PM IST

Glenn Phillips Catch of Ollie Pope Video : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ग्लेन फिलिप्सने एक अप्रतिम झेल पकडला आहे.

NZ vs ENG : ग्लेन फिलिप्सनं हे काय करून दाखवलं, असा झेल तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल! व्हिडीओ पाहा
NZ vs ENG : ग्लेन फिलिप्सनं हे काय करून दाखवलं, असा झेल तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल! व्हिडीओ पाहा

न्यूझीलंड क्रिकेट संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्च येथे होत आहे.

या सामन्यात न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्स याने अप्रतिम झेल घेतला. फिलिप्सचा हा झेल पाहून पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कारण फिलिप्सने घेतलेला हा झेल अविश्वसनीय होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३४८ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने पहिल्या डावात ५ गडी गमावून ३१९ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून हॅरी ब्रूकने १३२ धावांची शानदार खेळी केली. या डावात ब्रूकने ओली पोपसोबत १५१ धावांची भागीदारी केली.

पण टीम साऊदीने ही भागीदारी तोडली. पण ही भागिदारी तोडण्यात गोलंदाज साऊथीपेक्षा फिल्डर ग्लेन फिलिप्सची सर्वात मोठी भुमिका होती. कारण त्याने थरारक झेल घेऊन पोपला बाद केले.

पोपने साऊथीच्या ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू जोरात कट केला. हा चेंडू वेगाने सीमारेषेकडे जात होता. पण पॉइंटला फिल्डिंग करत असलेल्या ग्लेन फिलिप्सने हवेत उजवीकडे डायव्हिंग करत अप्रतिम झेल घेतला. हा चेंडू खूप दूर आणि वेगाने जात होता. पण तशाही परिस्थितीत फिलिप्सने तो पकडला. त्याच्या या झेलचे सर्वजण कौतुक करक आहेत.

ओली पोपचा डाव इथेच संपला. त्याचे शतक हुकले. त्याच्या रिअॅक्शवरून असे दिसून आले की फिलिप्सने असा झेल घेतला, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंनाही याची अपेक्षित नव्हती. पोपने ९८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या.

सामन्यात आतापर्यंत काय घडलं?

या सामन्यात न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने पहिल्या डावात ९३ धावा केल्या. विल्यमसनकडून शतकाची अपेक्षा होती जी पूर्ण होऊ शकली नाही. फिलिप्सनेही फलंदाजीचे योगदान देत ५८ धावा केल्या. इंग्लंडकडून बॅरिडॉन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. गस ऍटकिन्सनला दोन विकेट मिळाले.

इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २९ धावांनी मागे आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने पाच गडी गमावून ३१९ धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूक १३२ धावांवर नाबाद आहे. त्याच्यासोबत कर्णधार बेन स्टोक्स ३७ धावांसह खेळत आहे. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने दोन बळी घेतले. साऊथी, मॅट हेन्री आणि विल ओ'रुसी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या