NZ vs AFG : पिण्याचं पाणी नाही, शौचालय नाही, आता चक्क मैदानच खोदून ठेवलं! नोएडाच्या स्टेडिमयी दयनीय अवस्था
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  NZ vs AFG : पिण्याचं पाणी नाही, शौचालय नाही, आता चक्क मैदानच खोदून ठेवलं! नोएडाच्या स्टेडिमयी दयनीय अवस्था

NZ vs AFG : पिण्याचं पाणी नाही, शौचालय नाही, आता चक्क मैदानच खोदून ठेवलं! नोएडाच्या स्टेडिमयी दयनीय अवस्था

Updated Sep 10, 2024 03:27 PM IST

मैदानाचे काही नवे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दिसत आहे, की कर्मचाऱ्यांनी मैदान कोरडे करण्यासाठी चक्क मैदानच खोदले आहे.

NZ vs AFG : पिण्याचं पाणी नाही, शौचालय नाही, आता चक्क मैदानच खोदून ठेवलं! नोएडाच्या स्टेडिमयी दयनीय अवस्था
NZ vs AFG : पिण्याचं पाणी नाही, शौचालय नाही, आता चक्क मैदानच खोदून ठेवलं! नोएडाच्या स्टेडिमयी दयनीय अवस्था

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात फक्त एकच कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पण ग्रेटर नोएडा येथील मैदानाच्या खराब स्थितीमुळे दुसऱ्या दिवशीही खेळ सुरू होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी मैदान ओले असल्यामुळे नाणेफेकही होऊ शकली नव्हती.

दुसऱ्या दिवशीही मैदानाची स्थिती सुधारलेली नाही. आता मैदानाचे काही नवे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दिसत आहे, की कर्मचाऱ्यांनी मैदान कोरडे करण्यासाठी चक्क मैदानच खोदले आहे.

चक्क मैदानावर खोदकाम

कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (१० सप्टेंबर) सकाळी ९ वाजता नाणेफेक होणार होती. सकाळपासून नोएडामध्ये ऊन होते. अशा परिस्थितीत हा खेळ लवकर सुरू व्हायला हवा होता, मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये ग्राऊंड स्टाफ ३० यार्ड सर्कलमधील टर्फ काढून मैदानाची दुरुस्ती करण्यात व्यस्त असल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे.

दरम्यान, यावेळी ग्राउंड स्टाफ पंख्यांच्या साह्याने मैदाना कोरडे करण्याचा प्रयत्न करत होते, हे फोटो व्हायरल झाल्यावर मॅनेजमेंटवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे, तसेच, खिल्ली उडवली जात आहे.

जर परिस्थिती अशीच राहिली तर दुसऱ्या दिवसाचा खेळही रद्द करावा लागेल. सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधांचा अभाव असल्याने जोरदार टीका होत आहे.

दरम्यान, पहिल्याच दिवशी अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाने मैदानावरील कर्मचाऱ्यांसमोर अनेक समस्या मांडल्या होत्या. या संदर्भात दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली. मैदान ओले असण्याबरोबरच मैदानात पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा देण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या