NZ vs SL : थरारक! न्यूझीलंडच्या खेळाडूनं घेतला सूर्यकुमार यादवसारखा झेल, व्हिडीओ पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  NZ vs SL : थरारक! न्यूझीलंडच्या खेळाडूनं घेतला सूर्यकुमार यादवसारखा झेल, व्हिडीओ पाहा

NZ vs SL : थरारक! न्यूझीलंडच्या खेळाडूनं घेतला सूर्यकुमार यादवसारखा झेल, व्हिडीओ पाहा

Jan 11, 2025 03:19 PM IST

न्यूझीलंडच्या मॅट हेन्री याने सूर्यकुमार यादवसारखा अचूक झेल घेऊन २०२४ टी-२० वर्ल्ड कप फायनलच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

NZ vs SL : थरारक! न्यूझीलंडच्या खेळाडूनं घेतला सूर्यकुमार यादवसारखा झेल, व्हिडीओ पाहा
NZ vs SL : थरारक! न्यूझीलंडच्या खेळाडूनं घेतला सूर्यकुमार यादवसारखा झेल, व्हिडीओ पाहा

Matt Henry Catch Same As Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या त्या कॅचमुळेच भारताने २०२४ चा टी20 वर्ल्डकप जिंकला. सूर्याने वर्ल्डकप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर याचा झेल घेतला होता. आता असाच झेल न्यूझीलंडच्या खेळाडूने टिपला आहे.

न्यूझीलंडच्या मॅट हेन्री याने सूर्यकुमार यादवसारखा अचूक झेल घेऊन टी-२० वर्ल्ड कप फायनलच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सीमारेषेजवळ सूर्यासारखा झेल घेतला. हेन्रीच्या झेलचा व्हिडिओ न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये मॅट हेन्री चेंडूच्या दिशेने धावताना दिसत आहे. तसेच, चेंडू सीमारेषेबाहेर पडणार तेवढ्या त्याने चेंडू झेलला आणि सीमारेषेच्या आत हवेत फेकला, यानंतर तो पुन्हा सीमारेषेच्या आत आणि चेंडू अलगद झेलतो. सूर्यकुमार यादवनेही नेमके असेच केले होते.

न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यात काय घडलं?

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ विकेट्सच्या मोबदल्यात २९० धावा केल्या.

२९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. न्यूझीलंडने २९.४ षटकांत सर्वबाद १५० धावा केल्या. पाहुण्या संघाने हा सामना १४० धावांनी जिंकला. किवी संघाकडून मार्क चॅपमनने सर्वाधिक ८१ धावा केल्या. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो, महिष थीक्शाना आणि इशान मलिंगाने प्रत्येकी ३ बळी घेतले.

सूर्याच्या झेलमुळेच टीम इंडिया चॅम्पियन

दरम्यान, टी-20 वर्ल्डकप २०२४ फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. आफ्रिका संघाने ६ विकेट गमावल्या होत्या. संघासाठी शेवटचा योग्य फलंदाज डेव्हिड मिलर हा क्रीजवर होता.

शेवटच्या षटकात हार्दिक पंड्या गोलंदाजीला होता. पहिलाच चेंडू हार्दिकने यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला, पण तो फुल टॉस पडला, यावर मिलरने बॅट जोरात फिरवली आणि चेंडू वेगात सीमारेषेच्या बाहेर जात होता, तेवढ्यात सूर्याने अप्रतिम झेल घेतला. यानंतर आफ्रिकेकडे योग्य फलंदाज उरला नव्हता आणि भारताने फायनल लढत जिंकली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या