लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक, किवी फलंदाजाचा विश्वविक्रम, ट्रेव्हिस हेडचा रेकॉर्ड मोडला!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक, किवी फलंदाजाचा विश्वविक्रम, ट्रेव्हिस हेडचा रेकॉर्ड मोडला!

लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक, किवी फलंदाजाचा विश्वविक्रम, ट्रेव्हिस हेडचा रेकॉर्ड मोडला!

Oct 23, 2024 03:43 PM IST

Chad Bowes Breaks World Record: झळकावून खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

किवी फलंदाजाचं लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक
किवी फलंदाजाचं लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक (X)

Fastest List A Double Century: न्यूझीलंडचा फलंदाज चॅड बोझने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक करण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेड आणि भारतीय क्रिकेटपटू एन जगदीशन यांचा विश्वविक्रम मोडला आहे. कॅंटरबरीकडून फलंदाजी करणाऱ्या चाडने ओटागोविरुद्ध १०३ चेंडूत द्विशतक झळकावले, जे लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतक आहे. 

ट्रॅव्हिस हेड आणि एन जगदीशन यांनी यापूर्वी अनुक्रमे ११४-११४ चेंडूत द्विशतके झळकावली होती, पण चाडने या दोघांनाही मागे टाकले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना २०२१-२२ च्या मार्श कपमध्ये क्वीन्सलँडविरुद्ध ट्रॅव्हिस हेडने ही कामगिरी केली होती, तर जगदीशनने विजय हजारे ट्रॉफी २०२२ मध्ये तामिळनाडूकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध ११४ चेंडूत द्विशतक झळकावले होते.

चॅड बोझने या डावात एकूण २७ चौकार आणि सात षटकार ठोकले. त्याने ११० चेंडूत २०५ धावा केल्या. ज्याच्या जोरावर कँटरबरीने ५० षटकांत ९ बाद ३४३ धावा केल्या. चॅड वगळता त्याच्या संघातील अन्य कोणताही फलंदाज काही खास करू शकला नाही. झॅचरी फॉक्सने ४६ चेंडूत नाबाद ४९ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात ओटागोचा संपूर्ण संघ अवघ्या १०३ धावांवर आटोपला आणि कँटरबरीने हा सामना २४० धावांनी जिंकला. चॅडने न्यूझीलंडकडून सहा वनडे आणि ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकूण ९९ वनडे आणि १८७ टी-२० आंतरराष्ट्रीय धावा आहेत.

लिस्ट ए मध्ये द्विशतक झळकावणारे फलंदाज

१) चॅड बोझ- १०३ चेंडू (२०२४)

२) ट्रॅव्हिस हेड- ११४ चेंडू (२०२१)

३) नारायण जगदीसन- ११४ चेंडू (२०२२)

४) ट्रॅव्हिस हेड- ११७ चेंडू (२०१५)

५) बेन डकेट- १२३ चेंडू (२०१६)

६) जेमी हाऊ- १२६ चेंडू (२०१३)

७) इशान किशन-१२६ चेंडू (२०२२)

८) डी ऑर्सी- १२८ चेंडू (२०१८)

९) ग्लेन मॅक्सवेल- १२८ चेंडू (२०२३)

१०) पृथ्वी शॉ- १२९ चेंडू (२०२३)

Whats_app_banner
विभाग