India vs New Zealand 2nd Test Day 3 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाला ११३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघासमोर विजयासाठी ३५९ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य टीम इंडिया यशस्वीपणे पार करू शकले नाहीत.
पुणे कसोटीतील पराभवासह भारतीय संघाने मालिकाही गमावली आहे. न्यूझीलंडचा संघ प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. भारतीय संघासमोर विजयासाठी ३५९ धावांचे लक्ष्य होते, ज्याचा पाठलाग करताना त्यांना केवळ २४५ धावा करता आल्या.
पुणे कसोटीतील पराभवासह भारतीय संघाने मालिकाही गमावली आहे. न्यूझीलंडचा संघ प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. न्यूझीलंडच्या विजयाचा नायक डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनर ठरला, त्याने सामन्यात एकूण १३ विकेट घेतल्या. सँटनरने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या.
भारताचा हा पराभव ऐतिहासिक आहे कारण २०१२ नंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग १८ मालिका जिंकल्या होत्या, मात्र न्यूझीलंडने ही विजयाची मालिका संपवून इतिहास रचला आहे.
भारताने दुसऱ्या डावात ३५९ धावांचा पाठलाग करताना वेगवान सुरुवात केली. यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात १६ धावा केल्या. पण रोहित शर्माने नांगी टाकली. तो पुन्हा एकदा मिशेल सँटनरच्या गोलंदाजीवर केवळ ८ धावा करून स्वस्तात बाद झाला. त्यावेळी भारतीय संघाची धावसंख्या ३४ धावा होती. गिल (२३) सावधपणे खेळत होता, पण लंचनंतर लगेचच तो सँटनरच्या फिरकीत झेलबाद झाला.
भारतीय डावादरम्यान, जैस्वालने ४१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे न्यूझीलंडविरुद्ध भारतीयाने केलेले सर्वात जलद अर्धशतक होते. जैस्वाल चांगल्या टचमध्ये असल्याचे दिसत होते, पण तोही सँटनेरच्या फिरकीत झेलबाद झाला आणि ७७ धावांवर बाद झाला.
जैस्वाल हा या सामन्यातील सँटनरचा १०वा बळी ठरला. यानंतर पंत (०) १२७ धावांवर धावबाद झाला. कोहलीकडून (१७) मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तोही सँटनरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. कोहली बाद झाल्यावर भारतीय संघाची धावसंख्या १४७/५ झाली.
यानंतर सँटनरची जादू पुन्हा एकदा कामी आली आणि त्याने सरफराज खानला (९) क्लीन बोल्ड केले. भारताची सातवी विकेट वॉशिंग्टन सुंदरच्या (२१) रूपाने बाद झाली. जो ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर शॉर्ट लेगवर विल यंगच्या हाती झेलबाद झाला. सुंदर बाद झाल्यावर भारतीय संघाची धावसंख्या १६७/७ झाली.
यानंतर जडेजा आणि अश्विनने भारतीय डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र २०६ धावांवर अश्विन (१८) मिचेल सँटनरचा बळी ठरला. दुसऱ्या डावातील भारतीय संघाची ही आठवी विकेट आणि सॅन्टनरची सामन्यातील १३वी विकेट होती.
त्यानंतर एजाज पटेलने आकाश दीपला बाद करून भारताला नववा धक्का दिला. त्यानंतर इजाझने रवींद्र जडेजाला (४२ धावा) बाद करून भारतीय डाव गुंडाळला.
तत्पूर्वी, या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद २५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या १५६ धावांवर आटोपला. अशा स्थितीत न्यूझीलंडला १०३ धावांची आघाडी मिळाली. या आघाडीचा न्यूझीलंडला खूप फायदा झाला, त्यामुळे टीम इंडियाही बॅकफूटवर गेली.
संबंधित बातम्या