टीम इंडियाने नुकतीच मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. या मालिकेत टीम इंडियाने बांगलादेशचा २-० असा धुव्वा उडवला. आता टीम इंडिया १६ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध कसोटी तीन कसोटी मालिका खेळणार आहे.
या मालिकेसाठीचा संघ न्यूझीलंडने जाहीर केला आहे. संघ जाहीर करण्यासोबतच न्यूझीलंडने दोन प्रमुख समस्याही उघड केल्या, ज्या मालिकेदरम्यान संघासाठी अडचणीचे कारण बनू शकतात.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन उशिराने भारतात पोहोचेल. याआधी, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान विल्यमसनला मांडीच्या दुखापतीचा त्रास झाला होता. यातून सावरण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे.
याशिवाय संघाची दुसरी समस्या स्टार अष्टपैलू मायकेल ब्रेसवेल याच्याशी संबंधित आहे. ब्रेसवेल कसोटी मालिकेसाठी संघासह भारतात येणार आहे, परंतु बेंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीनंतर तो न्यूझीलंडला परतेल.
वास्तविक ब्रेसवेल त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे न्यूझीलंडला परत जाणार आहे. मालिकेतील शेवटच्या दोन कसोटींसाठी त्याची जागा ईश सोढी घेईल.
न्यूझीलंडकडून व्हाईट बॉल क्रिकेट खेळणाऱ्या मार्क चॅम्पमन याचा केन विल्यमसनचा कव्हर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४२.८१ च्या सरासरीने धावा करणाऱ्या चॅम्पमनला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघात स्थान देण्यात आले. न्यूझीलंडचा संघ शुक्रवारी (११ ऑक्टोबर) भारतासाठी रवाना होणार आहे.
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोढी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊदी, केन विल्यमसन, विल यंग.