sri lanka vs afganistan test scoercard : क्रिकेटमध्ये स्टीव्ह वॉ-मार्क वॉ, इरफान पठाण-युसूफ पठाण अशा भावांच्या अनेक जोड्या एकत्र खेळल्या आहेत. तसेच, शिवनारायण चंद्रपॉल आणि तेजनारायण चंद्रपॉल ही बाप-लेकाची जोडीही एकत्र प्रोफेशन क्रिकेट खेळली आहे. पण आता क्रिकेटमध्ये पुतण्या आणि काकाची जोडी आली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेटमधून ही काका-पुतण्याची जोडी आली आहे. विशेष म्हणजे पुतण्याने आधीच अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते, आणि आता त्याने म्हणजेच, पुतण्याने त्याच्या काकांना कसोटी पदार्पणाची कॅप दिली आहे.
वास्तविक, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात काक-पुतण्याची जोडी खेळत आहे.
या कसोटी सामन्यात पुतण्या इब्राहिम झद्रानने काका नूर अली झाद्रानसोबत शतकी भागीदारी केली. सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक होण्यापूर्वी त्याने काका नूर अलीला कॅप दिली.
यानंतर काका-पुतण्याची जोडी पहिल्या डावात सलामीला, पण पहिल्या डावात इब्राहिम झादराना शुन्यावर बाद झाला तर नूरी अलीने ४६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३१ धावांची खेळी केली. पहिल्या डावात अफगाणिस्तानचा संघ १९८ गारद झाला.
यानंतर या काका-पुतण्याच्या जोडीने दुसऱ्या डावात दमदार कामगिरी केली आणि पहिल्या विकेटसाठी षटकात १०६ धावांची भागीदाhttps://marathi.hindustantimes.com/cricket/james-anderson-bowled-rohit-sharma-on-a-superb-delivery-ind-vs-eng-2nd-test-vizag-watch-video-india-vs-england-dayhttps://marathi.hindustantimes.com/cricket/james-anderson-bowled-rohit-sharma-on-a-superb-delivery-ind-vs-eng-2nd-test-vizag-watch-video-india-vs-england-day-3-141707025485675.htmlरी केली. मात्र, नूर १३६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४७ धावा करून बाद झाला. यानंतर पुतण्या इब्राहिमने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. तिसऱ्या दिवसअखेर इब्राहिम झद्रान १०१ धावा करून नाबाद परतला.
नूर अलीने २००९ मध्ये वनडे पदार्पण केले होते. पण त्याला कसोटी पदार्पणासाठी बराच काळ वाट पाहावी लागली.
या कसोटीत श्रीलंकेने पहिल्या डावात १०९.२ षटकात सर्व गडी गमावून ४३९ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने २५९ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १४१ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय दिनेश चंडिमलने १८१ चेंडूत १० चौकार आणि १ षटकार मारत १०७ धावा केल्या. हा सामना कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळवला जात आहे.
संबंधित बातम्या