हाँगकाँग सुपर सिक्सेस क्रिकेट टुर्नामेंटमध्ये नेपाळने इंग्लंडचा पराभव करून क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे नेपाळने इंग्लंडचा ६ गडी राखून सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने ५.५ षटकांत सर्व ६ गडी गमावून ९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेपाळने ४.२ षटकांत एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठले.
नेपाळकडून संदीप जोराने सर्वाधिक धावा केल्या. १२ चेंडूत ५० धावा करून संदीप जोरा निवृत्त झाला. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार मारले. याशिवाय राशिद खान ५ चेंडूत २१ धावा करून नाबाद राहिला. राशिद खानने आपल्या खेळीत २ चौकार आणि २ षटकार मारले. तर लोकेश बामने ११ चेंडूत २० धावा केल्या.
इंग्लंडकडून रवी बोपाराने १२ चेंडूत सर्वाधिक ४९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १ चौकार आणि ७ षटकार मारले. तर समित पटेल १७ चेंडूत ३९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार मारले.
मात्र, या दोन फलंदाजांशिवाय इतर इंग्लिश फलंदाजांनी निराशा केली. इंग्लंडचा सलामीवीर ॲलेक्स डेव्हिस शून्यावर बाद झाला. त्याचवेळी जॉर्डन थॉम्पसन एकही धाव न काढता बाद झाला. एडवर्ड जॉर्ज बर्नार्डने ४ चेंडूत ५ धावा केल्या. रवी बोपारा आणि समित पटेल यांच्याशिवाय इतर इंग्लिश फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही.
नेपाळच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर प्रतिश घर्ती छेत्री हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. प्रतिश घर्ती छेत्रीने २ षटकात १८ धावा देत ३ बळी घेतले. नारायण जोशी, लोकेश बाम आणि बिबेक यादव यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.