भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा एकमेव असा स्पोर्ट्स स्टार आहे, ज्यावर कोणीच टीका करत नाही. नीरजचे जगाच्या कानाकोपऱ्यात चाहते आहेत. त्याचे व्हिडिओ पाहून युवा खेळाडू फिटनेसपासून ते आपल्या खेळापर्यंत सर्व गोष्टींची तयारी करतात.
नीरजच्या चाहत्यांच्या यादीत मुलींचीही संख्या खूप मोठी आहे. मात्र, आता नीरजच्या लग्नाच्या बातमीने अनेक मुलींची मनं दुखावली असतील.
दोन ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या या भालाफेकपटूने १९ जानेवारीच्या रात्री अचानक लग्नाची घोषणा केली. त्याने सोशल मीडिया पेज एक्स आणि इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आणि सांगितले की आजपासून तो हिमानी मोर हिचा झाला आहे. ही बातमी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी होती.
दरम्यान, त्याचे नाव भारतीय स्टार नेमबाज मनू भाकर हिच्याशी जोडले जात होते. लाजाळू स्वभावाच्या नीरजने अनेकदा लग्नाचा प्रश्न टाळला, पण जेव्हा त्याने लग्न केले, तेव्हा त्याने आपले प्रेम उघडपणे व्यक्त केले.
नीरजने हिमानी मोर हिच्यासोबत लग्न केले. यानंतर हिमानी मोर कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसला. या प्रश्नाचे उत्तर सोशल मीडियावर मिळाले नाही. पण यानंतर लोकांनी आपला मोर्चा सर्वांची माहिती ठेवणाऱ्या सर्च इंजिन 'गुगल' बाबांकडे वळवला.
चाहत्यांनी हिमानी मोरबद्दल सर्च केलेल्या गोष्टी थक्क करणाऱ्या होत्या. कारण कुणाला हिमानी मोराचे फोटो बघायचे होते तर कुणाला तिच्या वडिलांची माहिती हवी होती. लोकांनी नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर हिची जात कोणती, याचाही शोध घेतला.
हिमानी मोर टेनिस
हिमानी मोर कास्ट
हिमानी मोर जात
हिमानी मोर कोण आहे
हिमानी मोर वय
हिमानी मोर टेनिसपटू
हिमानी मोरे एज
हिमानी मोर इन्स्टाग्राम
हिमानी मोर फोटो
हिमानी मोर नेट वर्थ
हिमानी मोर प्रोफाइल
नीरजची पत्नी हिमानी मो २५ वर्षांची आहे. ती सोनिपतची असून लिटल एंजल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. हिमानी सध्या न्यू हॅम्पशायरमधील फ्रँकलिन पियर्स विद्यापीठात स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
हिमानीने मिरांडा हाऊस, दिल्ली येथे देखील शिक्षण घेतले. तिथे तिने राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षणात पदवी पूर्ण केली. तिला हिमांशू नावाता एक भाऊदेखील आहे, जो टेनिसपटू आहे.
हिमानीच्या शाळेच्या वेबसाइटनुसार तिने २०१६ मध्ये मलेशियामध्ये झालेल्या जागतिक ज्युनियर टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
संबंधित बातम्या