National Sports Awards 2023: भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मंगळवारी (९ जानेवारी २०२३) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी अर्जुन पुरस्कार मिळवणारा ५८ वा क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
क्रिकेटविश्वात सर्वात प्रथम क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांना हा पुरस्कार मिळाला होता. भारताचा स्टार फलंदाज शिखर धवन हा पुरस्कार मिळवणारा शेवटचा क्रिकेटपटू आहे. त्याने २०२१ मध्ये हा सन्मान मिळवला होता. गेल्या वर्षी या पुरस्कारासाठी एकाही क्रिकेटपटूला नामांकन मिळाले नव्हते. मात्र, यावेळी मोहम्मद शामीला अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मोहम्मद शामीसाठी २०२३ हे वर्ष चांगले ठरले. वर्षअखेरीस झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेतील सुरुवातीच्या ४ सामन्यांना मुकलेल्या शामीने अखेरच्या काही सामन्यात २४ विकेट घेतले. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज होता. विश्वचषकातील या कामगिरीबद्दल त्याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. टाळ्यांच्या कडकडाटात शामीला हा पुरस्कार देण्यात आला.
खेलरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंची यादी:
चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन), रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)
अर्जुन पुरस्कार मिळवणारे खेळाडू:
ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), श्रीशंकर एम (अॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाला (अश्वस्वार), दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कब्बडी), रितू नेगी (कब्बडी), नसरीन (खो-खो), सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स), ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग), सुश्री ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती), सुश्री अँटिम (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट),प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).