BBL : कसोटी संघातून वगळलेल्या नॅथन मॅकस्वीनी यानं बिग बॅश लीगमध्ये घातला धुमाकूळ, नंतर म्हणाला…
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BBL : कसोटी संघातून वगळलेल्या नॅथन मॅकस्वीनी यानं बिग बॅश लीगमध्ये घातला धुमाकूळ, नंतर म्हणाला…

BBL : कसोटी संघातून वगळलेल्या नॅथन मॅकस्वीनी यानं बिग बॅश लीगमध्ये घातला धुमाकूळ, नंतर म्हणाला…

Dec 23, 2024 11:09 AM IST

Nathan McSweeney : कठीण काळात निराश न होता जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली तर काय होऊ शकतं हे नॅथन मॅकस्वीनी यानं दाखवून दिलं आहे.

नॅथन मॅकस्वीनी टेस्ट
नॅथन मॅकस्वीनी टेस्ट (AP)

BBL News In Marathi : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरीत सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आलेल्या नॅथन मॅकस्वीनी यानं बिग बॅश लीगमध्ये धुमाकूळ घातला. बीबीएलमध्ये तुफानी खेळी करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. त्यामुळं ऑस्ट्रेलियन संघाचं लक्ष पुन्हा एकदा त्याच्याकडं वेधलं गेलं आहे.

नॅथन मॅकस्वीनीची निवड प्रथम फक्त पर्थ कसोटी सामन्यासाठी झाली होती. मात्र त्याला काही फार काही करता आलं नाही. पण त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा प्रत्येक फलंदाज अपयशी ठरत होता, त्यामुळं नॅथन मॅकस्वीनीला पुढील दोन सामन्यात संधी देण्यात आली. मात्र तिथंही तो अपयशी ठरला. त्यापैकी एका डावातील ३९ धावा वगळता त्याला कोणतीही प्रभावी खेळी करता आली नाही. त्यानंतर सॅम कोन्स्टासला संधी देऊन नॅथन मॅकस्वीनीला वगळण्यात आलं. त्यानंतर तो बिग बॅश लीगमध्ये उतरला आणि पहिल्या सामन्यात तुफानी खेळी करत ब्रिस्बेन हीट संघाला विजय मिळवून दिला.

मॅकस्वीनीनं ४९ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं नाबाद ७८ धावांची खेळी केली आणि तो सामनावीर ठरला. मॅट रेनशॉनं २७ चेंडूत ५४ धावा केल्या, पण नॅथन मॅकस्वीनी एका टोकाला उभा राहून खिंड लढवत राहिला आणि संघाला विजयाच्या जवळ नेऊनच माघारी परतला. 

मॅच विनिंग खेळीनंतर काय म्हणाला मॅकस्वीनी?

‘ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासोबत मला उत्तम अनुभव आला. मोठ्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करताना मजा आली. त्यातून मी बरंच शिकू शिकलो आहे. पुन्हा एकदा संघात परतण्याचा विश्वास मला आहे, परत येऊ शकेन,’ असा विश्वास त्यानं व्यक्त केला.

सुरुवात नाही, शेवट महत्त्वाचा

‘तुमच्या करिअरची सुरुवात कशी होते हे महत्त्वाचं नाही, तर ते कसं संपतं हे महत्त्वाचं आहे. हा प्रवासाचा भाग आहे.  चढ-उतार हे येतच राहणार. हा आडवळणाचा प्रवास शिकवणारा आहे. 'मी ब्रिस्बेनमध्ये वाढलो, हे माझं घर आहे. आमचा संघ मजबूत आहे, आमच्याकडं उत्तम खेळाडू (नेसर, स्पेन्सर जॉन्सन) आहेत, असंही तो म्हणाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या