मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Nathan Lyon : १८ वर्षानंतर कसोटीत ‘असं’ घडलं, नॅथन लायनच्या पुढे आता फक्त शेन वॉर्न, पाहा

Nathan Lyon : १८ वर्षानंतर कसोटीत ‘असं’ घडलं, नॅथन लायनच्या पुढे आता फक्त शेन वॉर्न, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 03, 2024 11:45 AM IST

New Zealand vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनने न्यूझीलंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात एकूण १० विकेट घेतल्या. यासह लायनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Nathan Lyon New Zealand vs Australia 1st Test
Nathan Lyon New Zealand vs Australia 1st Test (AFP)

Nathan Lyon New Zealand vs Australia 1st Test : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा १७२ धावांनी धुव्वा उडवला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात फिरकीपटू नॅथन लायनने ऑस्ट्रेलियसाठी चमकदार कामगिरी केली. लायनने आपल्या धमाकेदार कामगिरीने या सामन्यातून अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 

नॅथन लायनने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात त्याने २७ षटकात ६५ धावा देत ६ बळी घेतले. लायनमुळेच न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात १९६ धावांत सर्वबाद झाला. 

यानंतर नॅथन लायन हा न्यूझीलंडच्या भुमीवर एका कसोटीत १० बळी घेणारा दहावा गोलंदाज ठरला आहे. 

१८ वर्षांनंतर लायनने केली अशी कामगिरी

दरम्यान, २००६ नंतर पहिल्यांदाच एखाद्या फिरकी गोलंदाजाने न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. २००६ मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात डॅनियल व्हिटोरी आणि मुथय्या मुरलीधरन यांनी प्रत्येकी १० विकेट घेतल्या होत्या. आता १८ वर्षांनंतर नॅथन लायनने न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.

नॅथन लायन या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला

कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत नॅथन लायन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने रंगना हेराथला मागे टाकले आहे. लायनने कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावात आतापर्यंत ११९ विकेट्स घेतल्या आहेत. तर हेराथने ११५ विकेट घेतल्या होत्या. 

कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत शेन वॉर्न पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने कसोटीच्या चौथ्या डावात १३८ कसोटी विकेट घेतल्या आहेत.

कसोटीच्या चौथ्या डावात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

शेन वॉर्न- १३८ विकेट्स

नॅथन लियॉन- ११९ विकेट्स

रंगना हेरथ- ११५ विकेट्स

मुथय्या मुरलीधरन- १०६ विकेट्स

ग्लेन मॅकग्रा- १०३ विकेट्स

IPL_Entry_Point