मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Hardik Pandya : सगळ्यात मोठं गुपित उघड झालं! हार्दिक-नशाताशनं घटस्फोटाचं नाटक रचलं? जाणून घ्या

Hardik Pandya : सगळ्यात मोठं गुपित उघड झालं! हार्दिक-नशाताशनं घटस्फोटाचं नाटक रचलं? जाणून घ्या

Jun 03, 2024 08:59 PM IST

Hardik Pandya-Natasa Stankovic : सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने यापूर्वी डिलीट केलेले सर्व फोटो पुन्हा समोर आणले आहेत. यातील बहुतांश फोटो लग्नातील आहेत.

सगळ्यात मोठं गुपित उघड झालं! हार्दिक-नशाताशनं घटस्फोटाचं नाटक रचलं? जाणून घ्या
सगळ्यात मोठं गुपित उघड झालं! हार्दिक-नशाताशनं घटस्फोटाचं नाटक रचलं? जाणून घ्या

Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्या प्रचंड चर्चेत आहे. वास्तविक, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविकमध्ये सर्व काही ठीक नाही. दोघांमधली परिस्थिती इतकी बिघडली आहे की ती घटस्फोटापर्यंत पोहोचली आहे. तसेच, दोघेही लवकरच वेगळे होऊ शकतात, असेही बोलले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने यापूर्वी डिलीट केलेले सर्व फोटो पुन्हा समोर आणले आहेत. यातील बहुतांश फोटो लग्नातील आहेत.

हा सगळा पब्लिसिटी स्टंट होता हार्दिक पांड्याचा...'

मात्र, अशा परिस्थितीत प्रश्न असा पडतो की ते सर्व फोटो हटवण्याऐवजी नताशा स्टॅनकोविकने ते लपवून ठेवले होते किंवा आर्काइव्ह ठेवले होते आणि नंतर सेटिंग्जमधून रिस्टोअर केले, हे संपूर्ण प्रकरण काहीही असो, परंतु चाहते विविध प्रकारचे अनुमान लावत आहेत.

तसेच, सोशल मीडियावरील अनेक युजर्सचे म्हणणे आहे की, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यातील संबंध पुन्हा सुधारले आहेत, तर अनेकांचा असा विश्वास आहे की या दोघांमधील संबंध कधीच बिघडले नव्हते? सगळा पब्लिसिटी स्टंट होता. आपल्या खराब फॉर्मवरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी हार्दिक पांड्याने जाणूनबुजून सर्व नाटक रचल्याचे बोलले जात आहे.

वाद कसा सुरू झाला?

आयपीएल लिलावानंतर मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले. यानंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले, पण संघ व्यवस्थापनाची चाल पूर्णपणे फ्लॉप ठरली. फलंदाजीव्यतिरिक्त हार्दिक पांड्या या मोसमात गोलंदाजीतही फ्लॉप ठरला. तसेच, कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने निराशा केली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला केवळ ४ सामने जिंकता आले आणि गुणतालिकेत ते तळाच्या स्थानावर राहिले. यानंतर हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर आला.

टी-२० वर्ल्डकप २०२४