मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  सर्वात मोठी भविष्यवाणी! २०२४ हे वर्ष कोण गाजवणार? ICC च्या व्हिडीओतून आली ही दोन नावं, पाहा

सर्वात मोठी भविष्यवाणी! २०२४ हे वर्ष कोण गाजवणार? ICC च्या व्हिडीओतून आली ही दोन नावं, पाहा

Dec 31, 2023 05:02 PM IST

Nasser Hussain Prediction : विराट कोहलीने यावर्षी ३५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०४८ धावा केल्या आहेत. या वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Nasser Hussain Prediction
Nasser Hussain Prediction

Virat Kohli And Babar Azam : नवीन वर्षाचे आगमन होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. याआधी आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांचा आहे. या व्हिडीओत नासिर हुसेन यांनी येणाऱ्या नव्या वर्षात सर्वाधिक यश कोणता क्रिकेटपटू मिळवले, याची भविष्यवाणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वास्तविक, नासिर हुसेन यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याच्या उत्तरात हुसेन यांनी भविष्यवाणी केली आहे.

२०२४ या वर्षात सर्वाधिक यश मिळवणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव विचारण्यात आल्यानंतर नासिर हुसैन यांनी दोन फलंदाजांची नावे घेतली. नासिर हुसैन यांनी विराट कोहली आणि बाबर आझमचे नाव घेतले.

विराट आणि बाबर २०२४ हे वर्ष गाजवणार

नासिर हुसैन यांनी सांगितले की, 'माझी पहिली पसंती मेगास्टार आहे आणि यात शंका नाही. तो विराट कोहली आहे. २०२३ हे वर्ष त्याच्यासाठी अप्रतिम ठरले आणि विश्वचषकही अप्रतिम ठरला. एकापाठोपाठ एक असे अनेक मोठे विक्रम त्याने या वर्षात तोडले. या रेकॉर्ड्समध्ये आपण तो किती चांगली फलंदाजी करतोय, हे विसरलो.

तांत्रिकदृष्ट्या, मी विराट कोहलीची अशी फलंदाजी यापूर्वी कधीही पाहिली नाही. त्याची मानसिक स्थिती चांगली असून त्याचा खेळ अतिशय व्यवस्थित आहे'.

सोबतच, नासिर हुसैने पुढे म्हणाले की, यानंतर तोच आहे, ज्याची तुलना नेहमीच विराटशी केली जाते. बाबर आझम. मला वाटते की हे वर्ष त्याच्यासाठी आणि पाकिस्तान संघासाठी खूप मोठे असणार आहे.

त्याने कर्णधारपद सोडले आहे, याचा अर्थ त्याच्या खांद्यावरून मोठे ओझे हटले आहे. आता तो पाकिस्तानसाठी खूप धावा करू शकतो. कॅरेबियन भूमीवर टी-२० विश्वचषक आहे. गेल्या वेळीही पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला होता. आता त्यांना बाबरच्या खऱ्या कामगिरीची गरज असेल.

विराट आणि बाबरची २०२३ मधील कामगिरी

विराट कोहलीने यावर्षी ३५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०४८ धावा केल्या आहेत. या वर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर आहे.

विराटने या वर्षीही एकूण ८ शतके झळकावली आहेत. २०२३ मध्ये कोणत्याही फलंदाजाने एवढी शतके केली नाहीत. दुसरीकडे बाबर आझमसाठी हे वर्ष फारसे चांगले राहिले नाही. बाबरला यावर्षी २५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १३९९ धावा करता आल्या आहेत. या वर्षात त्याने ३ शतके झळकावली आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४