Video : न्यूयॉर्कचं स्टेडियम पाडण्याचं काम सुरू, २५० कोटींच्या स्टेडियमची खासियत काय? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : न्यूयॉर्कचं स्टेडियम पाडण्याचं काम सुरू, २५० कोटींच्या स्टेडियमची खासियत काय? जाणून घ्या

Video : न्यूयॉर्कचं स्टेडियम पाडण्याचं काम सुरू, २५० कोटींच्या स्टेडियमची खासियत काय? जाणून घ्या

Updated Jun 14, 2024 04:50 PM IST

New York is getting dismantled : न्यूयॉर्कचे नासाऊ स्टेडियम पाडण्याचे काम सुरू झाले आहे. याच मैदानावर भारत आणि पाकिस्तान सामना झाला होता.

Video : न्यूयॉर्कचं स्टेडियम पाडण्याचं काम सुरू, २५० कोटींच्या स्टेडियमची खासियत काय? जाणून घ्या
Video : न्यूयॉर्कचं स्टेडियम पाडण्याचं काम सुरू, २५० कोटींच्या स्टेडियमची खासियत काय? जाणून घ्या

Nassau County International Cricket Stadium : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असलेले न्यूयॉर्कचे नासाऊ इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम तोडण्यात येणार आहे. होय, हे स्टेडियम पाडण्याचे काम सुरू झाले आहे. हे स्टेडियम बनवण्यासाठी १०६ दिवसांचा कालावधी लागला होता. त्याच्या बांधकामासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च आला होता.

न्यूयॉर्कमधील नासाऊ स्टेडियमवरच भारताने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. टीम इंडियाने २०२४ टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्व सामने याच मैदानावर खेळले आहेत. भारत-पाकिस्तान सामनाही याच मैदानावर झाला होता. येथील खेळपट्टीही बरीच वादात सापडली होती. खरे तर या मैदानावर १०० धावा करणेही कठीण होत होते.

नासाऊ स्टेडियम का पाडले जात आहे?

हे स्टेडियम का पाडले जात आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तविक, न्यूयॉर्कचे नासाऊ स्टेडियम केवळ टी-20 विश्वचषका २०२४ साठी बांधले गेले होते. हे तात्पुरते स्टेडियम होते. हे तात्पुरते स्टेडियम होते, जिथे खेळपट्ट्याही बाहेरून आणल्या गेल्या होत्या. स्टेडियम पाडले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुलडोझर आणि क्रेनच्या साह्याने स्टेडियम पाडण्यात येत आहे.

या स्टेडियमची खासियत काय होती

न्यूयॉर्कचे नासाऊ स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे मॉड्यूलर स्टेडियम होते. येथे सुमारे ३० हजार प्रेक्षकांची बसण्याची सोय होती. इथली खेळपट्टी ऑस्ट्रेलियात तयार करण्यात आली आणि त्यानंतर या पीचला ड्रॉप इन करण्यात आले. या T20 विश्वचषकात येथे एकूण ८ सामने खेळले गेले. भारतीय संघाने येथे पाकिस्तानविरुद्ध ११९ धावांचा बचाव केला, तर दक्षिण आफ्रिकेने येथे बांगलादेशविरुद्ध ११३ धावांचा बचाव केला होता.

मात्र, कॅनडाने येथे सर्वात मोठी धावसंख्या उभारली. कॅनडाने येथे १३७ धावा केल्या होत्या, जी या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या ठरली. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी खूप उपयुक्त होती. या मैदानावर श्रीलंकेचा संघ अवघ्या ७७ धावांत गुंडाळला गेला आणि त्यानंतर ७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला घाम फुटला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या