Narendra Modi : पंतप्रधान मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये, शमीला काय म्हणाले? पाहा
narendra modi in indian dressing room : वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमवर पोहोचले होते
narendra modi visited the indian dressing room : क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवासह कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने भंगली. टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट फॅन्स १२ वर्षांपासून वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. तर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करत १४० कोटी लोकांचे स्वप्न भंग केले. संपूर्ण विश्वचषकात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, पण अंतिम सामन्यात संघाला चांगली कामगिरी करता आली नाही.
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या जोडीने चांगली सुरुवात केली. पण ३ विकेट लवकर पडल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने एकहाती सामना फिरवत भारताचा विजय हिरावून घेतला.
भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू भावूक झाले होते. यावेळी खेळाडू एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसले.
मोदींनी वाढवले टीम इंडियाचे मनोबल
वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमवर पोहोचले होते. ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी पीएम रिचर्ड मार्ल्स हे देखील मोदींसोबत स्टेडियममध्ये आले होते.
सामना संपल्यानंतर दोन्ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजयी संघाला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मोदी आणि मार्ल्स या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला ट्रॉफी दिली.
यानंतर पंतप्रधानांनी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंचे मनोबल वाढवले आणि प्रोत्साहन दिले. या प्रसंगाचे फोटो रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यावेळी मोहम्मद शमीने पंतप्रधान मोदींचे आभार मानताना लिहिले की, “दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो. पंतप्रधानांचेही आभार त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये येऊन आमचा उत्साह वाढवणला. आम्ही परत बाउन्स करू!”