Ahmedabad Motera Stadium: अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम बांधण्यासाठी किती पैसा खर्च झाला?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ahmedabad Motera Stadium: अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम बांधण्यासाठी किती पैसा खर्च झाला?

Ahmedabad Motera Stadium: अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम बांधण्यासाठी किती पैसा खर्च झाला?

Published Nov 19, 2023 03:51 PM IST

Narendra Modi Stadium cost: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे.

Narendra Modi Stadium
Narendra Modi Stadium

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना खेळला जात आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जात आहे, ज्याला मोटेरा स्टेडियम असेही म्हटले जाते. भारतातील मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये गणले जाते, जे तयार करण्यासाठी खूप खर्च लागला होता. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली २०२० या स्टेडियमचे बांधकाम पूर्ण झाले होते. या स्टेडियममध्ये एकावेळी एक लाख पेक्षा प्रेक्षक सामना पाहू शकतात.

मोटेरा स्टेडियम बांधण्यासाठी अंदाजे ८०० कोटी खर्च आला आहे. या स्टेडियमची वास्तू आणि सुविधांची नव्याने व्याख्या करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याच्या नवकल्पनांमध्ये अत्याधुनिक एलईडी दिवे, एक क्लब हाऊस, अनेक इनडोअर पिच, मल्टिपल ड्रेसिंग रूम, व्हीआयपी बॉक्स आणि हजारो वाहने ठेवण्यास हे स्टेडियम सक्षम आहेत. या मैदानाची रचना सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक मेळावे आणि विविध क्रीडा उपक्रम आयोजित करण्यासाठी करण्यात आली होती.

अहमदाबादमधील हे मैदान १९८२ मध्ये खेळण्यासाठी पूर्ण झाले. मात्र, त्यावेळी मैदानात केवळ ४९ हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता होती. पण २०१५ साली पंतप्रधान आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी स्टेडियम पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला. या स्टेडियमचे बांधकाम २०२० मध्ये पूर्ण झाले. आता या स्टेडियममध्ये एकावेळी एक लाख ३२ हजार प्रेक्षक सामने पाहू शकतात. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे जगातील सर्वात मोठे मैदान होते, जिथे एकावेळी ९० हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात.

हे स्टेडियम सुमारे ६३ एकरमध्ये पसरलेले आहे, ज्याला ४ गेट आहेत. याशिवाय, या स्टेडियममध्ये ४ ड्रेसिंग रूम आहेत. क्रिकेट स्टेडियममध्ये साधारणपणे दोन ड्रेसिंग रूम असतात. सरावासाठी ६ इनडोअर खेळपट्ट्या आहेत, तर ३ मैदानी खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत. तसेच या स्टेडियममध्ये क्रिकेट अकादमी आहे. या स्टेडियममध्ये चाहत्यांच्या बसण्यासाठी केलेली व्यवस्था कौतुकास्पद आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या