अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अनेक ऐतिहासिक सामन्यांचे साक्षीदार आहे. २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना याच मैदानावर खेळला गेला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला आणि सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला.
या मैदानाचे आधी सरदार पटेल स्टेडियम होते, परंतु २०१४ मध्ये, हे सरदार पटेल पुन्हा बांधण्यास सुरुवात झाली. २०२१ मध्ये मैदानाचे बांधकाम पूर्ण झाले आणि भव्य उद्घाटन करण्यात आले. मैदान नव्याने बांधून तयार झाल्यानंतर या मैदानाला नरेंद्र मोदी स्टेडियम असे नाव देण्यात आले. हे नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट ग्राऊंड आहे तसेच, हे अनेक जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे, ज्यामध्ये १,३२,००० लोक एकत्र बसून थेट सामन्याचा आनंद घेऊ शकतात. हे मैदान ६३ एकर जागेवर पसरलेले आहे, परंतु त्याहूनही विशेष म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पार्किंगमध्ये एकाच वेळी ३,००० वाहने उभी करता येतात. मैदानाची पार्किंगची जागा एवढी मोठी आहे की तीन हजार वाहनांशिवाय १० हजार दुचाकीही या मैदानात पार्क करता येतील.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्रिकेटशिवाय इतर खेळांसाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे फुटबॉल, हॉकी स्टेडियम आणि बास्केटबॉल कोर्ट देखील आहे. त्याच्या आत एक वेगळी क्रिकेट अकादमी आहे, त्यात दोन स्वतंत्र मैदाने आहेत, जिथे खेळाडू सराव करू शकतात. तसेच, मैदानात अनेक नेट उपलब्ध आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियम हे एलईडी लाईटची सुविधा असलेले भारतातील पहिले क्रिकेट मैदान होते. आता भारतात हळूहळू एलईडी लाइटिंगचा ट्रेंड वाढत आहे. तसेच, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही लॉर्ड्सचे मैदान एलईडी लाईटने सुसज्ज केले आहे.
संबंधित बातम्या