Namibia vs Oman Highlights : टी-20 विश्वचषक २०२४ चा तिसरा सामना नामिबिया आणि ओमान यांच्यात खेळला गेला. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.
सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना २१ धावा केल्या आणि ओमानला २२ धावांचे लक्ष्य दिले. धावांचा पाठलाग करताना ओमानला १ बाद १० धावाच करता आल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात नामिबियाने टॉस जिंकून प्रथम केली. यानंतर ओमानचा डाव प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १०९ धावांवर गडगडला. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाला चांगली सुरुवात झाली नाही आणि संघाला २० षटकात ६ विकेट गमावत केवळ १०९ धावा करता आल्या. सामना टाय झाला आणि सुपर ओव्हर खेळवण्यात आली. नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून T20 विश्वचषकाची शानदार सुरुवात केली.
नामिबियासाठी सुपर ओव्हरमध्ये डेव्हिड व्हीसा हिरो ठरला. व्हीसाने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत दमदार कामगिरी केली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने २१ धावा ठोकल्या. संघासाठी डेव्हिड व्हीजेने पहिल्या दोन चेंडूत १ चौकार आणि १ षटकार ठोकत १० धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर २ धावा आणि चौथ्या चेंडूवर १ धाव आली. यानंतर स्ट्राईकवर आलेल्या कर्णधार गेरहार्ड इरास्मसने २ चेंडूत२ चौकार मारून संघाला २१ धावांपर्यंत नेले.
त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानचे फलंदाज केवळ १० धावा करू शकले. नामिबियाकडून डेव्हिड व्हीजेने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली.
ओमानच्या नसीम खुशीने व्हीजेच्या पहिल्या चेंडूवर २ धावा घेतल्या आणि पुढच्या चेंडूवर डॉट झाला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर नसीम बोल्ड झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या आकिबने पुढच्या दोन चेंडूंवर १-१ धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, अशाप्रकारे ओमानला १ बाद १० धावाच करता आल्या.
संबंधित बातम्या