Ranji Trophy Final : मुशीर खानने सचिनचा २९ वर्ष जुना विक्रम मोडला, फायनलमध्ये शतक झळकावून इतिहास रचला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy Final : मुशीर खानने सचिनचा २९ वर्ष जुना विक्रम मोडला, फायनलमध्ये शतक झळकावून इतिहास रचला

Ranji Trophy Final : मुशीर खानने सचिनचा २९ वर्ष जुना विक्रम मोडला, फायनलमध्ये शतक झळकावून इतिहास रचला

Published Mar 13, 2024 11:57 AM IST

Musheer Khan Century Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीच्याया हंगामात मुशीर खानने दमदार फलंदाजी केली आहे. त्याने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत द्विशतक झळकावले. यानंतर उपांत्य फेरीत अर्धशतक केले. आणि आता त्याने विदर्भाविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत शतक झळकावून संघाला संकटातून बाहेर काढले.

 Musheer Khan Century Ranji Trophy Final मुशीर खानने सचिनचा 29 वर्ष जुना विक्रम मोडला, फायनलमध्ये शतक झळकावून इतिहास रचला
Musheer Khan Century Ranji Trophy Final मुशीर खानने सचिनचा 29 वर्ष जुना विक्रम मोडला, फायनलमध्ये शतक झळकावून इतिहास रचला (PTI)

Musheer Khan Broke Sachin Tendulkar Record : रणजी ट्रॉफी २०२३-२४ चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईने विदर्भसमोर ५२८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईकडून दुसऱ्या डावात मुशीर खानने शानदार शतक ठोकले.

या शतकासह मुशीरने एक खास विक्रम केला आहे. मुशीरने ३२६ चेंडूत १३६ धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत १० चौकार मारले. शतक झळकावल्यानंतर हर्ष दुबेच्या चेंडूवर मुशीर खान पॅव्हेलियनमध्ये परतला. 

त्याच वेळी, या शतकानंतर मुशीर खानने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जवळपास २९ वर्षे जुना विक्रम मोडला. वास्तविक, मुशीर खानने वयाच्या १९ वर्षे १४ दिवसांत शतक झळकावले. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने २२ व्या वाढदिवसापूर्वी पंजाबविरुद्ध द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता.

मुंबई आणि विदर्भ यांच्यातील अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मासारखे दिग्गज उपस्थित आहेत. सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत मुशीर खानने मास्टर ब्लास्टरचा २९ वर्ष जुना विक्रम मोडला. तसेच मुशीर खानचे वडील नौशाद खानही स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. मुशीर खानच्या शतकानंतर वडील नौशाद खान यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांनी मुशीरच्या शतकानंतर जबरदस्त सेलिब्रेशन केले.

त्याचवेळी या रणजी ट्रॉफी हंगामात मुशीर खानने दमदार फलंदाजी केली आहे. त्याने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत द्विशतक झळकावले. यानंतर उपांत्य फेरीत अर्धशतक केले. आणि आता त्याने विदर्भाविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत शतक झळकावून संघाला संकटातून बाहेर काढले. मुशीर खानच्या शतकामुळे मुंबईने दुसऱ्या डावात ४१८ धावा केल्या. अशाप्रकारे विदर्भासमोर विजयासाठी ५२८ धावांचे लक्ष्य आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या