Musheer Khan : १९ वर्षीय मुशीर खानने इतिहास रचला, सचिन तेंडुलकरचा ३३ वर्ष जुना महाविक्रम मोडला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Musheer Khan : १९ वर्षीय मुशीर खानने इतिहास रचला, सचिन तेंडुलकरचा ३३ वर्ष जुना महाविक्रम मोडला

Musheer Khan : १९ वर्षीय मुशीर खानने इतिहास रचला, सचिन तेंडुलकरचा ३३ वर्ष जुना महाविक्रम मोडला

Sep 06, 2024 03:48 PM IST

१९ वर्षीय फलंदाजाने धावा डाव सावरण्याचे काम हाती घेतले आणि एका टोकाला खंबीरपणे उभा राहत पहिल्याच दिवशी शानदार झळकावण्याचा महान पराक्रम केला.

Musheer Khan : १९ वर्षीय मुशीर खानने इतिहास रचला, सचिन तेंडुलकरचा ३३ वर्ष जुना महाविक्रम मोडला
Musheer Khan : १९ वर्षीय मुशीर खानने इतिहास रचला, सचिन तेंडुलकरचा ३३ वर्ष जुना महाविक्रम मोडला

दुलीप करंडक स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून यामध्ये ४ संघ सहभागी होत आहेत. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारत-अ आणि इंडिया-ब यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, सरफराज खान आणि वॉशिंग्टन सुंदर या स्टार्सनी फ्लॉप शॉ दाखवला.

पण यानंतर १९ वर्षीय फलंदाजाने धावा डाव सावरण्याचे काम हाती घेतले आणि एका टोकाला खंबीरपणे उभा राहत पहिल्याच दिवशी शानदार शतक झळकावण्याचा महान पराक्रम केला. हा फलंदाज दुसरा-तिसरा कोणी नसून सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान आहे, ज्याने दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना शतक झळकावून मोठा पराक्रम केला.

दुलीप ट्रॉफी पदार्पणातच विक्रम रचला

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुशीर खान २२७ चेंडूत नाबाद १०५ धावा करून परतला आणि त्याच्या संघाची धावसंख्या ७ गड्यांच्या मोबदल्यात २०२ धावा झाली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला मुशीरने पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारली आणि नवदीप सैनीच्या साथीने ८व्या विकेटसाठी २०४ धावांची अप्रतिम भागीदारी केली.

या दरम्यान, मुशीरने आपली धावसंख्या १५० च्या पुढे नेली. सरफराजचा धाकटा भाऊ पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावण्याच्या मार्गावर होता, पण कुलदीप यादवने त्याला बाद केले. अशा प्रकारे मुशीरची ही ऐतिहासिक खेळी संपुष्टात आली.

सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात मुशीरला द्विशतक झळकावता आले नाही. पण त्याने १८१ धावांच्या खेळीने सचिन तेंडुलकरचा ३३ वर्षांचा विक्रम मोडला.

मुशीरने ३७३ चेंडूंचा सामना केला आणि १६ चौकार आणि ५ षटकार मारले. दुलीप करंडक पदार्पणाच्या सामन्यात किशोरवयीन (२० वर्षाखालील) फलंदाजाची ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने जानेवारी १९९१ मध्ये दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात १५९ धावा केल्या होत्या. आता मुशीरने सचिन तेंडुलकरला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे.

दुलीप ट्रॉफी पदार्पणाच्या सामन्यात सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम बाबा अपराजितच्या नावावर आहे. बाबा अपराजितने २१२ धावा केल्या होत्या. यानंतर यश धुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने १९३ धावांची खेळी केली होती. या दोन खेळाडूंनंतर मुशीरनेने आता या विशेष यादीत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान पक्के केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या