Musheer Khan Accident : मुशीर खान थोडक्यात बचावला, कार अपघातात मानेला फ्रॅक्चर, इराणी कपमधून बाहेर-musheer khan accident sarfaraz khan brother musheer met with an accident ruled out of iran cup ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Musheer Khan Accident : मुशीर खान थोडक्यात बचावला, कार अपघातात मानेला फ्रॅक्चर, इराणी कपमधून बाहेर

Musheer Khan Accident : मुशीर खान थोडक्यात बचावला, कार अपघातात मानेला फ्रॅक्चर, इराणी कपमधून बाहेर

Sep 28, 2024 10:56 AM IST

musheer khan accident : मुंबईचा उदयोन्मुख फलंदाज मुशीर खान रस्ता अपघातात जखमी झाला आहे. त्याला काही गंभीर दुखापती झाल्या असून त्यामुळे तो इराणी कपमध्ये खेळू शकणार नाही. अलीकडेच मुशीर खानने दुलीप ट्रॉफीमध्ये अप्रतिम फलंदाजी केली. मुशीर याला काही ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत.

Musheer Khan Accident : मुशीर खान थोडक्यात बचावला, कार अपघातात मानेला फ्रॅक्चर, इराणी कपमधून बाहेर
Musheer Khan Accident : मुशीर खान थोडक्यात बचावला, कार अपघातात मानेला फ्रॅक्चर, इराणी कपमधून बाहेर (HT_PRINT)

क्रिकेटर सरफराज खान याचा भाऊ युवा क्रिकेटपटू मुशीर खान याचा अपघात झाला आहे. लखनौहून कानपूरला जात असताना हा कार अपघात घडला. या अपघातात त्याच्या मानेला फ्रॅक्चर झाले. मुशीर याच्यासोबत त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खानही होते. मात्र, मुशीर खानचा अपघात कसा झाला हे सध्या कळू शकलेले नाही. या अपघातानंतर मुशीर बराच काळ मैदानात परतू शकणार नसल्याचे मानले जात आहे.

मुशीरला पूर्णपणे बरे होण्यासाठी ६ आठवडे ते ३ महिने लागू शकतात. अशा स्थितीत मुशीर इराणी चषकात खेळणार नसल्याचे मानले जात आहे. इराणी चषकाचा सामना पुढील महिन्यात १ ऑक्टोबरपासून लखनौच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याशिवाय मुशीर रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधूनही बाहेर राहू शकतो.

मुशीर खानची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी

मुशीर खान गेल्या काही काळापासून धमाकेदार कामगिरी करत आहे. विशेषत: लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याने टीम इंडियासाठी दावेदारी सादर केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या दुलीप करंडक स्पर्धेत मुशीरने दमदार फलंदाजी केली होती. मुशीरने भारत अ संघातर्फे भारत ब विरुद्ध १८१ धावांची स्फोटक खेळी खेळली.

तथापि, यानंतर तो नक्कीच आपल्या लयीपासून दूर गेला परंतु जर आपण या फॉरमॅटमध्ये १९ वर्षांच्या मुशीरची सरासरी पाहिली तर ती ५१.१४ आहे आणि त्याने १५ डावात ३ शतके आणि एक अर्धशतकांसह ७१६ धावा केल्या आहेत.

इराणी कपसाठी दोन्ही संघ

मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, सरफराज खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेंडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अद्धातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मुशीर खान, मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन डायस.

शेष भारत संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इस्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुथार, सरांश जैन, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद. , राहुल चहर.

Whats_app_banner
विभाग