Shakib Al Hasan : धक्कादायक! क्रिकेटर शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या-murder case against bangladesh cricket all rounder shakib al hasan ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shakib Al Hasan : धक्कादायक! क्रिकेटर शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Shakib Al Hasan : धक्कादायक! क्रिकेटर शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Aug 23, 2024 05:30 PM IST

बांगलादेशी क्रिकेटर शाकिब अल हसन आणि अभिनेता फिरदौस अहमद यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाकिब अल हसन हा या प्रकरणातील २८वा आरोपी आहे तर फिरदौस अहमद हा ५५वा आरोपी आहे.

Shakib Al Hasan : क्रिकेटर शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Shakib Al Hasan : क्रिकेटर शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसन याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. वास्तविक, शाकिब अल हसनवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शाकिब अल हसन पाकिस्तान दौऱ्यावर आहे.

मात्र या आता शकिब अल हसनच्या अडचणी वाढू शकतात. बांगलादेशी मीडियानुसार, मृत रुबेलचे वडील रफिकुल इस्लाम यांनी ढाका येथील अडबोर पोलिस स्टेशनमध्ये शकीब अल हसनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुबेल हे कापड कामगार होते, त्याचा निषेधादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शकिब अल हसनवर काय आरोप?

शाकिब अल हसनशिवाय बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमद याच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाकिब अल हसन हा या प्रकरणातील २८वा आरोपी आहे तर फिरदौस अहमद हा ५५वा आरोपी आहे.

याशिवाय इतर आरोपींमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना, ओबेदुल कादर आणि अन्य १५४ लोकांचा समावेश आहे. या प्रकरणात सुमारे ४००-५०० अज्ञात लोकांना आरोपी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुबेल ५ ऑगस्ट रोजी अडबोर रिंग रोडवरील निषेध मोर्चात सहभागी झाला होता. या रॅलीत, नियोजित गुन्हेगारी कटाचा भाग म्हणून कोणीतरी जमावावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्यावेळी रुबेलचा मृत्यू झाला. छातीत आणि पोटात गोळी लागल्यानंतर रुबेलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे ७ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.

या आंदोलनादरम्यान शकीब हसन बांगलादेशात नव्हता. तो ग्लोबल टी-20 कॅनडा लीगमध्ये बांगला टायगर्स मिसिसागा संघाचे नेतृत्व करत होता.  

शेख हसीना यांच्या पक्षाचे खासदार

शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगच्या तिकिटावर शाकिब अल हसन आणि फिरदौस अहमद हे खासदार निवडून आले होते. मात्र, शेख हसीना यांचे सरकार सत्तेवरून बेदखल झाल्यानंतर या दोघांनीही आपली खासदारकी गमावली. मात्र, सध्या शाकिब अल हसन बांगलादेशी संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.