SMAT 2024 Final : मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, सुर्यांश शेडगे, सूर्यकुमार यादवची वादळी फलंदाजी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SMAT 2024 Final : मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, सुर्यांश शेडगे, सूर्यकुमार यादवची वादळी फलंदाजी

SMAT 2024 Final : मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, सुर्यांश शेडगे, सूर्यकुमार यादवची वादळी फलंदाजी

Dec 15, 2024 08:21 PM IST

Mumbai vs Madhya Pradesh Final : मुंबईने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. मुंबईने फायनलमध्ये मध्य प्रदेशचा ५ गडी राखून पराभव केला.

SMAT 2024 Final : मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, सुर्यांश शेडगे, सूर्यकुमार यादवची वादळी फलंदाजी
SMAT 2024 Final : मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, सुर्यांश शेडगे, सूर्यकुमार यादवची वादळी फलंदाजी

Mumbai vs Madhya Pradesh Highlights SMAT Final  : मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. मुंबईने फायनलमध्ये मध्य प्रदेशचा ५ गडी राखून पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाकडून सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे आणि सूर्यांश शेडगे यांनी दमदार कामगिरी केली.

सूर्यांशने ३६ धावांची स्फोटक खेळी खेळली. तर मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदारने नाबाद ८१ धावा केल्या. मात्र त्याची खेळी व्यर्थ गेली.

प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशने मुंबईला १७५ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात मुंबईने १७.५ षटकांत सामना जिंकला. सूर्यांशने संघासाठी अप्रतिम कामगिरी केली. १५ चेंडूंचा सामना करत त्याने नाबाद ३६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. अथर्वने ६ चेंडूत १६ धावा केल्या. त्याने २ षटकार मारले. अशा प्रकारे संघाने विजेतेपद पटकावले.

रहाणेची दमदार कामगिरी 

मध्य प्रदेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई संघाकडून पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे सलामीला आले. पृथ्वी विशेष काही करू शकला नाही. तो १० धावा करून बाद झाला. मात्र रहाणेने ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने ३० चेंडूंचा सामना करत ४ चौकार मारले.

कर्णधार श्रेयस अय्यर १६ धावा करून बाद झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला. शिवम दुबे अवघ्या ९ धावा करून बाद झाला.

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक हुकले 

मुंबईसाठी सूर्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या काळात त्याने ३५ चेंडूंचा सामना करत ४८ धावा केल्या. सूर्याच्या या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याचे अर्धशतक हुकले.

पाटीदारने मध्य प्रदेशसाठी खेळली तुफानी खेळी 

मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १७४ धावा केल्या. यावेळी रजत पाटीदारने धमाकेदार परफॉर्मन्स दिला. ४० चेंडूंचा सामना करताना त्याने नाबाद ८१ धावा केल्या. पाटीदारने या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकार मारले.

सुभ्रांशु सेनापतीने २३ धावांची खेळी केली. त्याने १७ चेंडूंचा सामना करत २ षटकार ठोकले. व्यंकटेश अय्यर १७ धावा करून बाद झाला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. हरप्रीत सिंगने १५ धावांचे योगदान दिले.

मुंबईकडून शार्दुल-तनुषने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

फायनलमध्ये मुंबईकडून शार्दुल ठाकूरने २ बळी घेतले. शार्दुलने ४ षटकात ४१ धावा देत २ बळी घेतले. रॉयस्टन डायसने ३ षटकात ३२ धावा देत २ बळी घेतले. शिवम दुबे, श्रेयांश शेडगे आणि अथर्व यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Whats_app_banner