श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई क्रिकेट संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने मध्य प्रदेशचा ५ गडी राखून पराभव केला. मुंबईच्या विजयात सुर्यांश शेडगे याने महत्त्वाचे योगदान दिले.
सुर्यांश शेडगे सातव्या क्रमांकावर फलंदाजी आला, त्याने १५ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३६ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यामुळे संघाला जवळपास एकतर्फी विजय मिळवण्यात मदत झाली. सुर्यांशला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीराचा किताब मिळाला.
मुंबईने धावांचा पाठलाग करताना १७.५ षटकांत १८०/५ धावा करून विजय मिळवला. यादरम्यान स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ३५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेश संघाने २० षटकात ८ बाद १७४ धावा केल्या. यादरम्यान कर्णधार रजत पाटीदारने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ४० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ८१ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. १५ धावांच्या स्कोअरवर टीमने पृथ्वी शॉच्या रूपाने पहिली विकेट गमावली. शॉ १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर संघाला दुसरा धक्का कर्णधार श्रेयस अय्यरच्या रूपाने ४७ धावांच्या स्कोअरवर बसला. अय्यरने ९ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १६ धावा केल्या.
यानंतर संघाने ९९ धावांच्या स्कोअरवर अजिंक्य रहाणेच्या रूपाने तिसरी विकेट, १२१ धावांच्या स्कोअरवर शिवम दुबेच्या रूपात चौथी विकेट आणि स्कोअरवर सूर्यकुमार यादवच्या रूपात पाचवी विकेट गमावली.
रहाणेने ३७, शिवम दुबेने ९ आणि सूर्यकुमार यादवने ४८ धावा केल्या. त्यानंतर सहाव्या विकेटसाठी सूर्यांश शेडगे आणि अंकोलेकर यांनी अवघ्या २० चेंडूत ५१ धावांची भागिदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
संबंधित बातम्या