टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया प्रथम बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचली. भारतीय संघाचे विमान दुपारी तीनच्या सुमारास दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास विस्तारा फ्लाइट क्रमांक 'UK1845' टीम इंडियाला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले.
विमातळावरून भारतीय खेळाडू बसमध्ये चढले आणि मरीन ड्राइव्हला पोहोचले. या ठिकाणहून टीम इंडियाची ओपन बसमधून विजयी परेडला सुरुवात झाली. मरीन ड्राईव्हवर चाहत्यांचा जनसागर लोटला आहे. लाखो लोकांच्या गर्दीमुळे रस्ता दिसणेही अवघड झाले आहे.
एका बाजूला पाणी, दुसरीकडे जनसागर
मरीन ड्राइव्हचे दृश्य असे आहे की एका बाजूला पाण्याचा समुद्र तर एका बाजूला रस्त्यांवर लाखो लोकांच्या गर्दीचा सागर दिसत आहे. दुपारी फोटो समोर आले तेव्हा रस्त्यांवर अत्यल्प गर्दी होती, पण जसजशी संध्याकाळ होत गेली तसतशी लोकांची संख्याही वाढत गेली. रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात असला तरी या गर्दीमुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.
रोहित शर्मा आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी 'X' द्वारे सांगितले होते की मरीन ड्राइव्हवर विजय परेड संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल. मात्र भारतीय संघाला खूप उशीर झाला. जवळपास अडीच तास उलटून गेल्यानंतर विजयाची परेड सुरू झाली. काही वेळापूर्वी वानखेडे स्टेडियम आणि मरीन ड्राईव्हवर पाऊस पडला होता, त्यामुळे तेथील वातावरण आल्हाददायक झाले होते.
संबंधित बातम्या