इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) २०व्या सामन्यात आज (७ एप्रिल) मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मुंबई प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद २३४ धावा ठोकल्य आहेत.
मुंबईसाठी टीम डेव्हिडने २१ चेंडूंत ४ षटकार आणि २ चौकारांसह नाबाद ४५ धावा केल्या. शेवटी आलेल्या रोमारियो शेफर्डने १० चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. शेफर्डने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार मारले.
डावाचे शेवटचे षटक एनरिक नॉर्खियाने टाकले. या षटकात शेफर्डने एकूण ३२ धावा केल्या. डेव्हिड आणि शेफर्ड या दोघांनी १३ चेंडूत ५३ धावांची भागीदारी केली.
मुंबईने शेवटच्या ५ षटकांत एक गडी गमावून ९६ धावांचा पाऊस पाडला. वानखेडेतील ही मुंबईतील सर्वोच्च धावसंख्या आहे. नॉर्खियाने ४ षटकांत दोन बळी घेत ६५ धावा दिल्या. त्यापूर्वी रोहित शर्मा (४९) आणि इशान किशन (४२) यांनी पहिल्या विकेटसाठी ७ षटकात ८० धावांची भागिदारी केली.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलग तीन सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे दिल्लीने ४ पैकी तीन सामने गमावले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्खिया, इशांत शर्मा, खलील अहमद.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह.