mumbai indians full schedule : आयपीएल २०२४ च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी आयपीएलचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्जच्या होम ग्राउंडवर म्हणजेच चेपॉक मैदानावर होणार आहे. प्लेऑफचे सामने २१ मेपासून सुरू होणार असून अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे.
तर मुंबई इंडियन्स या मोसमातील शेवटचा साखळी सामना १७ मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळणार आहे. पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स यंदा कधी, कुठे आणि कोणासोबत भिडणार हे येथे आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई इंडियन्स वि गुजरात टायटन्स - २२ मार्च - संध्याकाळी ७:३० - अहमदाबाद
मुंबई इंडियन्स वि सनरायझर्स हैदराबाद - २७ मार्च - संध्याकाळी ७:३० - हैदराबाद
मुंबई इंडियन्स वि राजस्थान रॉयल्स - १ एप्रिल - संध्याकाळी ७:३० - मुंबई
मुंबई इंडियन्स वि दिल्ली कॅपिटल्स - ७ एप्रिल - दुपारी ३:३० - मुंबई
मुंबई इंडियन्स वि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - ११ एप्रिल - संध्याकाळी ७:३० - मुंबई
मुंबई इंडियन्स वि चेन्नई सुपर किंग्स - १४ एप्रिल - संध्याकाळी ७:३०- मुंबई
मुंबई इंडियन्स वि पंजाब किंग्स - १८ एप्रिल - संध्याकाळी ७:३० - मोहाली
मुंबई इंडियन्स वि राजस्थान रॉयल्स - २२ एप्रिल - संध्याकाळी ७:३० - जयपूर
मुंबई इंडियन्स वि दिल्ली कॅपिटल्स - २७ एप्रिल - दुपारी ३:३० - दिल्ली
मुंबई इंडियन्स वि लखनौ सुपर जायंट्स - ३० एप्रिल - संध्याकाळी ७:३० - लखनौ
मुंबई इंडियन्स वि कोलकाता नाइट रायडर्स - ३ मे - संध्याकाळी ७:३० - मुंबई
मुंबई इंडियन्स वि सनरायझर्स हैदराबाद - ६ मे - संध्याकाळी ७:३० - मुंबई
मुंबई इंडियन्स वि कोलकाता नाइट रायडर्स - ११ मे - संध्याकाळी ७:३० - कोलकाता
IPL २०२४ च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ९ गडी गमावून १६२ धावाच करू शकला. अखेरच्या षटकात संघाला १९ धावांची गरज होती. हार्दिकने पहिल्या दोन चेंडूंवर १० धावा केल्या, पण उमेश यादवने पुढच्या दोन चेंडूंवर २ बळी घेत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.