Mumbai Indians Captaincy : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. त्याआधी सर्वच संघ जबरदस्त तयारी करत आहेत. या आयपीएलमधील कामगिरीच्या आधारेच आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी संघाची निवड केली जाणार आहे.
तत्पूर्वी, आज (१८ मार्च) मुंबई इंडियन्सने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि हेड कोच मार्क बाउचर यांनी संवाद साधला.
आयपीएलच्य मिनी ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे संघाची जबाबदारी दिली. यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिकवर प्रचंड टीका केली. रोहितच्या चाहत्यांना हा निर्णय आवडला नाही.
अशातच आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबतच पंड्यावर प्रश्नांचा भडीमार केला. एका प्रश्नाच्या उत्तरात, हार्दिक पंड्याने कबूल केले की जेव्हा तो गुजरात टायटन्स सोडून रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला, तेव्हा चाहत्यांनी त्याच्यावर प्रचंड टीका केली. एवढेच नाही तर रोहितच्या चाहत्यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचेही पांड्याने सांगितले.
तसेच, पांड्या पुढे म्हणाला की, आम्ही खेळासाठी काय आवश्यक आहे त्यावर लक्ष केंद्रित करतो. मी माझ्या हातात असलेल्या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. चाहत्यांना सर्व अधिकार आहेत आणि मी त्यांच्या मताचा आदर करतो'.
यानंतर हार्दिकने मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटचे आभार मानले. तसेच, मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली.
माजी कर्णधार रोहित शर्माचे नेतृत्व करणे पांड्यासाठी आव्हान आहे, परंतु त्यांना त्यांच्या नात्यावरही विश्वास आहे. याबाबत हार्दिक म्हणाला, ‘जेव्हा मला गरज असेल तेव्हा तो (रोहित) मला मदत करेल. तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. सतत मालिका आणि टूरमध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही दोघे आजपर्यंत एकमेकांशी बोलू शकलो नाही’. पण गरज असल्यास तो निश्चित मला मदत करेल, असेही पांड्या म्हणाला.
विराट कोहलीनंतर रोहित शर्माने भारतीय क्रिकेट चांगल्या प्रकारे हाताळले. संघाला आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकता आली नसली, तरी पूर्वीप्रमाणेच शानदार शैलीत फायनल गाठणे सुरूच ठेवले. रोहित शर्माचे कर्णधारपद आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट होते, त्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन बनवले होते, तरीही फ्रँचायझीने त्याला कर्णधारपदावरून काढून टाकले आणि हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवले.
आता, 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2024 च्या आधी, मुंबई इंडियन्सची पत्रकार परिषद आहे, ज्यामध्ये नवनियुक्त कर्णधार हार्दिक पंड्यासह मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर देखील उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी पंड्यावर प्रश्नांचा भडीमार केला.