रोहितला कर्णधारपदावरून का काढले? प्रश्न ऐकताच, हार्दिक आणि बाउचरचा चेहरा पडला, व्हिडीओ पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रोहितला कर्णधारपदावरून का काढले? प्रश्न ऐकताच, हार्दिक आणि बाउचरचा चेहरा पडला, व्हिडीओ पाहा

रोहितला कर्णधारपदावरून का काढले? प्रश्न ऐकताच, हार्दिक आणि बाउचरचा चेहरा पडला, व्हिडीओ पाहा

Mar 19, 2024 03:44 PM IST

Mumbai Indians Press Conference : सोमवारी (१८ मार्च) मुंबई इंडियन्सने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि हेड कोच मार्क बाउचर यांनी संवाद साधला.

Mumbai Indians' captain रोहितला कर्णधारपदावरून का काढले? प्रश्न ऐकताच, हार्दिक आणि बाउचरचा चेहरा पडला, व्हिडीओ पाहा
Mumbai Indians' captain रोहितला कर्णधारपदावरून का काढले? प्रश्न ऐकताच, हार्दिक आणि बाउचरचा चेहरा पडला, व्हिडीओ पाहा (AFP)

IPL 2024, Mumbai Indians Captaincy : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. त्याआधी सर्वच संघ जबरदस्त तयारी करत आहेत. या आयपीएलमधील कामगिरीच्या आधारेच आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी संघाची निवड केली जाणार आहे.

तत्पूर्वी, सोमवारी (१८ मार्च) मुंबई इंडियन्सने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि हेड कोच मार्क बाउचर यांनी संवाद साधला.

आयपीएलच्य मिनी ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे संघाची जबाबदारी दिली. यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिकवर प्रचंड टीका केली. रोहितच्या चाहत्यांना हा निर्णय आवडला नाही.

अशातच आता पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत पंड्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी एका पत्रकाराने रोहितला कर्णधार पदावरून हटवण्याचे कारण विचारले. पण पांड्या आणि हेड कोच बाउचर या दोघांकडेही या प्रश्नाचे उत्तर नव्हते.

वास्तविक, हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स, हार्दिक पांड्या आणि टीम मॅनेजमेंटवर जोरदार टीका झाली.

आता पत्रकाराच्या प्रश्नावर हार्दिक आणि बाउचर काहीच बोलले नाहीत. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि नकारार्थी मान हलवली. पत्रकार परिषदेतील या प्रसंगाची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, बाउचरच्या मौनामुळे हार्दिक आणि रोहित यांच्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित शर्मासोबत मतभेद नाहीत- पांड्या

दरम्यान, याच पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याने रोहित शर्मासोबतच्या मतभेदाच्या अफवांवर मौन सोडले. रोहित शर्माकडून मला खूप काही शिकायला मिळाले असून रोहितने नेहमीच त्याला पाठिंबा दिला आहे, असे तो यावेळी म्हणाला. हार्दिकने असेही सांगितले की त्याच्या कारकिर्दीतील अर्ध्याहून अधिक काळ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली व्यतीत झाला आहे आणि तो त्याचा खूप आदर करतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या