मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : यॉर्कर स्पेशलिस्ट बनला अर्जुन तेंडुलकर, मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीत खूपच सुधारणा, पाहा

Video : यॉर्कर स्पेशलिस्ट बनला अर्जुन तेंडुलकर, मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीत खूपच सुधारणा, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 13, 2024 12:18 PM IST

Arjun Tendulkar Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अर्जुन तेंडुलकरचा आहे.

 Arjun Tendulkar यॉर्कर स्पेशलिस्ट अर्जुन तेंडुलकर... मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजी खूपच सुधारणा, पाहा
Arjun Tendulkar यॉर्कर स्पेशलिस्ट अर्जुन तेंडुलकर... मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजी खूपच सुधारणा, पाहा

Arjun Tendulkar Net Practice IPL 2024 : आगामी आयपीएलसाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२४ ची सुरुवात होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सलामीचा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. पण या सामन्यापूर्वी आयपीएलचे सर्व संघ जबरदस्त तयारी करत आहेत. सर्वच संघांची सराव शिबिरं सुरू आहेत.

या दरम्यान मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अर्जुन तेंडुलकरचा आहे.

माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमध्ये आपले नाव कमावण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. भारतीय डोमेस्टिक सर्किटमध्ये संमिश्र कामगिरी केल्यानंतर अर्जुनने आता इंडियन प्रीमियर लीगसाठी तयारी सुरू केली आहे. वेगवान गोलंदाज अष्टपैलू अर्जुन हा पाचवेळा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सकडून खेळतो. गेल्या मोसमात पदार्पण केल्यानंतर या वेळी त्याला पुन्हा सर्वांना प्रभावित करण्याची संधी मिळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात मंगळवारी (१२ मार्च) तो किलर गोलंदाजी करताना दिसला.

अर्जुन तेडुलकर मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा माजी दिग्गज लसिथ मलिंगा याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या स्कील्स मजबूत करत आहे.

मुंबई इंडियन्सच्या अधिकृत X हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अर्जुन प्रभावी यॉर्कर टाकताना दिसत आहे.अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने या सरावात धारदार आणि अचूक यॉर्कर मारत फलंदाजांना अडचणीत आणले. अर्जुनच्या या पंजा तोड यॉर्करने फलंदाजाचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडल्या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की ‘अर्जुन अर्जुनसारखे काम करत आहे.’

दरम्यान, अर्जुन तेंडुलकरची अशी घातक गोलंदाजी पाहून मागे उभ्या असलेल्या लसिथ मलिंगाला त्याचे दिवस आठवत असतील. तोही असेच यॉर्कर टाकण्यासाठी ओळखला जायचा.

तसेच, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मलिंगा अर्जुनसोबत काहीतरी बोलताना दिसत आहे. यावरून अर्जुनने अचूक यॉर्कर टाकत मलिंगाचे लक्ष वेधून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. जर त्याने नेटमध्ये चांगली गोलंदाजी सुरू ठेवली तर त्याला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. या मोसमात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सशी होणार आहे.

IPL_Entry_Point