SMAT 2024 : मुंबईने टी-20 मध्ये सर्वात मोठं लक्ष्य गाठलं, अजिंक्य रहाणेच्या बळावर इतिहास घडला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SMAT 2024 : मुंबईने टी-20 मध्ये सर्वात मोठं लक्ष्य गाठलं, अजिंक्य रहाणेच्या बळावर इतिहास घडला

SMAT 2024 : मुंबईने टी-20 मध्ये सर्वात मोठं लक्ष्य गाठलं, अजिंक्य रहाणेच्या बळावर इतिहास घडला

Dec 12, 2024 08:34 AM IST

Mumbai vs Vidarbha SMAT 2024 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघाने नवा विश्वविक्रम रचला आहे. मुंबईने टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. विदर्भाविरुद्धच्या सामन्यात मुंबईसमोर २२२ धावांचे लक्ष्य होते, जे संघाने ४ चेंडू राखून गाठले.

SMAT 2024 : मुंबईने टी-20 मध्ये सर्वात मोठं लक्ष्य गाठलं, अजिंक्य रहाणेच्या बळावर इतिहास घडला
SMAT 2024 : मुंबईने टी-20 मध्ये सर्वात मोठं लक्ष्य गाठलं, अजिंक्य रहाणेच्या बळावर इतिहास घडला

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ च्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईने विदर्भाचा ६ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि शिवम दुबे या फलंदाजांनी क्वार्टर फायनलमध्ये मुंबई संघासाठी धमकाकेदार कामगिरी केली. या विजयासह मुंबईने टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रमही केला. 

या फॉरमॅटमधील बाद फेरीत सर्वात मोठे लक्ष्य गाठण्याचा विक्रम मुंबईने केला आहे. टी-20 मध्ये २२० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठणारा मुंबई आता पहिला संघ बनला आहे.

या बाबतीत, मुंबईने पाकिस्तानच्या फैसल बँक टी-20 कप २०१० मधील एका सामन्याचा विक्रम मोडला. या स्पर्धेत कराची डॉल्फिन संघाने रावळपिंडी रॅम्सविरुद्ध २१० धावांचे लक्ष्य गाठले होते.

मुंबईबद्दल बोलायचे झाले तर विदर्भाने त्यांना सामन्यात २२२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने १९.२ षटकात २२४ धावा करून पूर्ण केले.

मुंबई आणि विदर्भ सामन्यात काय घडलं?

या सामन्यात विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबईने १९.२ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. मुंबईकडून अजिंक्य रहाणेने ४५ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८४ धावा केल्या.

रहाणे आणि पृथ्वी शॉ यांनी पहिल्या विकेटसाठी ७ षटकांत ८३ धावा जोडून मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. डावखुरा वेगवान गोलंदाज दीपेश परवानी याने पृथ्वीला बाद करून ही भागीदारी मोडली.

कर्णधार श्रेयस अय्यर (५) आणि भारताचा टी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधार सूर्यकुमार यादव (९) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. अशा स्थितित मुंबईची धावसंख्या ११.१ षटकात तीन विकेट्सवर ११८ धावा झाली.

शेवटच्या ८ षटकात संघाला विजयासाठी १०४ धावांची गरज होती. रहाणे डावाच्या १६व्या षटकात १५७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मधल्या फळीतील फलंदाज शिवम दुबे (२२ चेंडूत नाबाद ३७, १ चौकार, २ षटकार) आणि सुयांश शेडगे (१२ चेंडूत नाबाद ३६, १ चौकार, ४ षटकार) यांनी शेवटच्या ४ षटकात ६७ धावांची भागीदारी केली आणि मुंबईला विजय मिळवून दिला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या