मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni at Paris : धोनी कुटुंबासह पोहोचला फ्रान्सला, फॅमिली ट्रिपचे सुंदर फोटो आले समोर, पाहा

MS Dhoni at Paris : धोनी कुटुंबासह पोहोचला फ्रान्सला, फॅमिली ट्रिपचे सुंदर फोटो आले समोर, पाहा

Jun 11, 2024 10:15 PM IST

MS Dhoni with his family at Paris : टीम इंडियाचा माजी कर्णधार त्याच्या कुटुंबासोबत फ्रान्सच्या दौऱ्यावर आहे. त्याने आयफेल टॉवरसमोरील फोटो पोस्ट केला आहे.

MS Dhoni : धोनी कुटुंबासह पोहोचला फ्रान्सला, फॅमिली ट्रिपचा फोटो आला समोर, पाहा
MS Dhoni : धोनी कुटुंबासह पोहोचला फ्रान्सला, फॅमिली ट्रिपचा फोटो आला समोर, पाहा

MS Dhoni with his family at Paris : कॅप्टन कूल अर्थात एमएस धोनीची प्रत्येक स्टाईल व्हायरल होते, मग ती क्रिकेटच्या मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर. आयपीएल २०२४ संपल्यानंतर एमएस धोनी रांची येथील त्याच्या घरी आला. येथे काही दिवस राहिल्यानंतर धोनी आता फ्रान्सच्या दौऱ्यावर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

धोनी त्याच्या कुटुंबासोबतचा फ्रान्स फिरत आहे. धोनीच्या या फॅमिली ट्रिपचे काही फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर संपूर्ण कुटुंबासोबत उभा आहे.

धोनी कुटुंबासह फ्रान्समध्ये

एमएस धोनी, त्याची पत्नी साक्षी आणि त्यांची ९ वर्षांची मुलगी झिवा हे फ्रान्समध्ये सुट्टी घालवत आहेत. आयफेल टॉवरसमोरील एका सुंदर फोटोत तिघेही एकत्र कैद झाले असून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो एमएस धोनीची मुलगी झिवा धोनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या पोस्टला ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

धोनीची IPL २०२४ मधील कामगिरी

कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त झालेल्या धोनीने IPL २०२४ च्या ११ डावांमध्ये २२० च्या अप्रतिम स्ट्राइक रेटने १६१ धावा केल्या. विशेष म्हणजे एमएस धोनी डावाच्या शेवटच्या दोन षटकांमध्येच फलंदाजीला यायचा.

धोनीच्या निवृत्त होणार अशी चर्चा

आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी जेव्हा एमएस धोनीला कर्णधारपदावरून मुक्त करण्यात आले तेव्हा चाहत्यांना वाटले की तो आता आयपीएलमध्ये खेळणार नाही, परंतु तो आयपीएल २०२४ खेळला. धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते मैदानात यायचे. कारण हा सीझन एमएस धोनीचा शेवटचा सीझन असू शकतो असे चाहत्यांना वाटत होते.

मात्र, एमएस धोनीने आयपीएल २०२५ मध्येही खेळावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. बरं, आतापर्यंत एमएस धोनीकडून निवृत्तीबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. अशा स्थितीत महेंद्रसिंह धोनी आयपीएल २०२५ खेळतो की त्यापूर्वी निवृत्त होतो हे पाहणे बाकी आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४