टीम इंडियाचा माजी कर्णाधार एम एस धोनी याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली. पण तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. आपल्या नेतृत्वाखाली संघाला ५ वेळा चॅम्पियन बनवणारा धोनी आता ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली खेळतो.
विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी आयपीएलचा मोसम सुरू झाल्यानंतर धोनी आता निवृत्त होणार, अशा चर्चा सुरू होते आणि मोसम संपल्यानंतर या सर्व चर्चा थांबतात. धोनीचा फिटनेस अजूनही चांगला आहे. पण त्याला गुडघेदुखीची समस्या आहे, ज्यासाठी त्याला २०२३ मध्ये ऑपरेशन करावे लागले होते.
दरम्यान, त्याच्यासोबत खेळणाऱ्या रॉबिन उथप्पा याने मोठा दावा केला असून तो पुढील ४ वर्षे आयपीएल खेळला तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असे म्हटले आहे.
एमएस धोनीला गुडघ्याची समस्या आहे आणि आयपीएल २०२३ नंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. आयपीएलच्या मागील दोन हंगामात त्याने एकूण १३० चेंडू खेळले आहेत आणि त्यात तो चांगला दिसत होता. यावेळीही धोनीच्या निवृत्तीची अटकळ बांधली जात आहे.
रॉबिन उथप्पा Jio Hotstar वर म्हणाला, "जर तुमच्याकडे ते कौशल्य असेल आणि तुमच्यात पुढे जाण्याची जिद्द असेल तर मला वाटत नाही की तुम्हाला काहीही रोखू शकेल.
आयपीएल २०२५ हंगामाच्या शेवटी तो निवृत्त झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. पण धोनी पुढील ४ आयपीएल हंगाम खेळला तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
पहिल्या सत्रापासून चेन्नई सुपरजायंट्सकडून खेळत असलेला एमएस धोनी २ वर्षे पुणे सुपरजायंट्सकडून खेळला, त्यादरम्यान सीएसकेवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर धोनी सीएसकेमध्ये परतला.
धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नईसाठी ५ विजेतेपद पटकावले आहेत. धोनीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने २६४ सामन्यांमध्ये ५३४३ धावा केल्या आहेत. त्याने IPL मध्ये २४ अर्धशतकांच्या खेळी खेळल्या आहेत, IPL मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ८४ धावा आहे.
संबंधित बातम्या