भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याची पत्नी साक्षी धोनी अनेकदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दलचे अपडेट्स देत असते.
या दरम्यानट, आता साक्षीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सिगारेट ओढताना दिसत आहे.
साक्षीचा सिगारेट ओढतानाचा फोटो भारतातील नसून परदेशातील आहे. हा फोटो एका पार्टीमधील असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये साक्षी सिगारेट पेटवताना दिसत आहे.
मात्र, साक्षी प्रत्यक्षात धूम्रपान करत असल्याचे या फोटोवरून निश्चित करता येत नाही. पण चाहते साक्षी धोनीच्या या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
साक्षी धोनीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नयनरम्य ग्रीसमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल करिश्मा तन्नाही दिसली.
दरम्यान, करिश्मा तन्नानेही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामध्ये चाहत्यांना साक्षीच्या हातात सिगारेट दिसली.
साक्षीचे नाव सिगारेट ओढतानाच्या संदर्भात चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही, तिच्या कॉलेजच्या दिवसांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जो धूम्रपानाशी संबंधित होता. पण साक्षी खरंच धुम्रपान करेत की नाही याबात खात्रीशीरपणे सांगितले जाऊ शकत नाही.
दरम्यान, एमएस धोनीचा हुक्का ओढतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. धोनीच्या या व्हिडिओची बरीच चर्चा झाली होती. व्हिडिओमध्ये माही मित्रांसोबत हुक्का ओढताना दिसत होता.