Dhoni-Kohli : धोनी की कोहली? कोणाची संपत्ती जास्त, दोन्ही दिग्गज वर्षाला किती कमावतात? जाणून घ्या-ms dhoni virat kohli net worth 2024 dhoni kohli brand endorsements dhoni kohli ipl salary cicket ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Dhoni-Kohli : धोनी की कोहली? कोणाची संपत्ती जास्त, दोन्ही दिग्गज वर्षाला किती कमावतात? जाणून घ्या

Dhoni-Kohli : धोनी की कोहली? कोणाची संपत्ती जास्त, दोन्ही दिग्गज वर्षाला किती कमावतात? जाणून घ्या

Sep 27, 2024 10:53 AM IST

ms dhoni virat kohli net worth : महेंद्रसिंह धोनी याची एकूण संपत्ती १२७ मिलियन डॉलर्स म्हणजेच १०४० कोटी रुपये इतकी आहे. त्याच वेळी, विराट कोहली याची एकूण संपत्ती १३० मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १०९० कोटी रुपये इतकी आहे.

Dhoni-Kohli : धोनी की कोहली? कोणाची संपत्ती जास्त, दोन्ही दिग्गज वर्षाला किती कमावतात? जाणून घ्या
Dhoni-Kohli : धोनी की कोहली? कोणाची संपत्ती जास्त, दोन्ही दिग्गज वर्षाला किती कमावतात? जाणून घ्या (ANI)

महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली हे दोघेही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठे स्टार आहेत. धोनीने आपल्या शांत नेतृत्व आणि अतुलनीय क्रिकेट कौशल्याने भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेले, तर विराट कोहली त्याच्या आक्रमक खेळासाठी आणि फिटनेससाठी ओळखला जातो.

मैदानावर प्रचंड यश संपादन केल्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी बिझनेसच्या जगातही प्रवेश केला आणि खूप नाव कमावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमएस धोनी जगातील दुसरा सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे, तर विराट कोहली जगातील तिसरा सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे.

२०२४ मध्ये धोनी आणि कोहलीची एकूण संपत्ती

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२४ मध्ये महेंद्रसिंह धोनी याची एकूण संपत्ती १२७ मिलियन डॉलर्स म्हणजेच १०४० कोटी रुपये इतकी आहे. त्याच वेळी, विराट कोहली याची एकूण संपत्ती १३० मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १०९० कोटी रुपये इतकी आहे. २०२३ मध्ये कोहलीची एकूण संपत्ती १०१९  कोटी रुपये होती, जी आता २०२४ मध्ये आणखी वाढली आहे.

आयपीएलमधून कमाई

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी कर्णधार धोनीचे आयपीएलमधील एकूण उत्पन्न १८८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. धोनीचा पगार दरवर्षी ११.१२ कोटी रुपये आहे. त्याचवेळी विराट कोहली हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याला दरवर्षी १५ कोटी रुपये मानधन मिळते.

ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणूक

महेंद्रसिंह धोनीने पेप्सी, रिबॉक आणि गल्फ ऑइल सारख्या अनेक मोठ्या ब्रँड्ससोबत जाहिरातींचे करार केले आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की धोनी प्रत्येक जाहिरातीसाठी ३.५ ते ६ कोटी रुपये घेतो.

विराट कोहलीनेही ब्रँड एंडोर्समेंटच्या जगात मोठे नाव कमावले आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो दिवसाला २ कोटी रुपये घेतो, तो भारताचा सर्वात महागडा ब्रँड ॲम्बेसेडर बनतो. MRF आणि Puma सोबत कोहली ऑडी इंडिया, Adidas, Pepsi, Google Duo, Myntra, Vivo सारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सचा ॲम्बेसेडर आहे.

Whats_app_banner