MS Dhoni IPL 2024 : आगामी आयपीएलसाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२४ ची सुरुवात होणार आहे.
या महामुकाबल्यापूर्वी, चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या सराव शिबिरात सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सहभाग घेतला. यावेळी धोनी आपल्या जुन्या लांब केसांच्या लुकमध्ये दिसला. यावेळी धोनीने फलंदाजीचा कसून सराव केला. आज शनिवारी (९ मार्च) चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर या शिबिराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
आयपीएल २०२३ नंतर धोनीच्या गुडघ्यांवर सर्जरी करण्यात आली. पण आता तो पूर्णपणे फिट दिसत असून फलंदाजी करताना चांगल्या लयीत दिसत होता.
एमएस धोनी नेट प्रॅक्टिसमध्ये आत्मविश्वासाने भरलेला दिसत होता. धोनीने जास्त मोठे शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला नाही, पण तो मोठ्या आत्मविश्वासाने फलंदाजी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सरावादरम्यान एमएस धोनीने फिरकीपटूंचा सामना केला आणि चेपॉकमधील परिस्थिती ओळखण्याचा प्रयत्न केला. धोनीने मार्चच्या सुरुवातीला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या जामनगर येथील प्री वेडिंग सेरेमनीलाही उपस्थिती लावली होती. या प्री वेडिंग सेरेमनीनंतर धोनी थेट चेन्नईला पोहोचला आहे.
धोनी आता २२ मार्चला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या या उद्घाटन सामन्यात सर्वांच्या नजरा त्याच्या मॅच फिटनेसवर असतील.
धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. धोनीने २५० सामने खेळले आहेत. या काळात धोनीने ५०८२ धावा केल्या आहेत. धोनीने या फॉरमॅटमध्ये २४ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
संबंधित बातम्या