मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Electoral Bonds Data : धोनीच्या सीएसकेनं इलेक्टोरल बाँडद्वारे या पक्षाला दिली देणगी, देणगीची रक्कम किती? पाहा

Electoral Bonds Data : धोनीच्या सीएसकेनं इलेक्टोरल बाँडद्वारे या पक्षाला दिली देणगी, देणगीची रक्कम किती? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 18, 2024 04:28 PM IST

आयपीएल २०२४ साठी सीएसके पूर्णपणे सज्ज झाली आहे. सीएसकेचा पहिला सामना विराट कोहलीच्या आरसीबीविरुद्ध होणार आहे. यंदाच्या आयपीएलचा हा उद्घाटनचा सामना असेल.

Electoral Bonds Data : धोनीच्या सीएसकेनं इलेक्टोरल बाँडद्वारे या पक्षाला दिली देणगी, देणगीची रक्कम किती? पाहा
Electoral Bonds Data : धोनीच्या सीएसकेनं इलेक्टोरल बाँडद्वारे या पक्षाला दिली देणगी, देणगीची रक्कम किती? पाहा (Chennai Super Kings Twitter)

महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपर किंग्स आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रेंचायझी आहे. तसेच, सीएसके सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत ५ वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.

आता आयपीएल २०२४ साठीही सीएसके पूर्णपणे सज्ज झाला आहे. सीएसकेचा पहिला सामना विराट कोहलीच्या आरसीबीविरुद्ध होणार आहे. यंदाच्या आयपीएलचा हा उद्घाटनचा सामना असेल. दोन्ही संघ चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. 

दरम्यान, धोनीची सीएसके सध्या देशात गाजत असलेल्या इलेक्टोरल बाँडमुळे चर्चेत आली आहे.

CSK ने AIADMK ला दिली देणगी 

आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज आणि त्यांचे प्रमोटर इंडिया सिमेंट्सचे एन श्रीनिवासन यांनी निवडणूक रोख्यांच्या (इलेक्टोरल बॉन्ड) माध्यमातून राजकीय पक्षाला देणग्या दिल्याचे निवडणूक आयोगाने उघड केले आहे. ते तामिळनाडू पक्ष AIADMK चे प्रमुख देणगीदार आहेत. पक्षाला इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून ६ कोटी रुपये मिळाले.

इंडिया सिमेंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमला ५ कोटी ९० लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी तीनदा १ कोटी रुपये दान केले. याशिवाय २९ रोखे हे प्रत्येकी १० लाख रुपयांचे आहेत. हा सर्व निधी २ एप्रिल ते ४ एप्रिल २०१९ या दोन दिवसांत निवडणूक रोख्यांद्वारे पक्षाला प्राप्त झाला. त्यानंतरच्या वर्षांत पक्षाला कोणतेही इलेक्टोरल बॉंड मिळाले नाहीत. तामिळनाडू विधानसभेत AIADMK चे ९ आमदार आहेत. 

२२ मार्चला आरसीबी-सीएसके भिडणार

चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२४च्या पहिल्याच सामन्यात मैदानात उतरणार आहे. गतविजेत्या चेन्नईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. हा सामना २२ मार्च रोजी चेन्नईचे होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर होणार आहे.

WhatsApp channel