मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ms Dhoni Hookah : कॅप्टन कुलनं वातावरण तापवलं! काळा सूट, लांब केस, हातात हुक्का... धोनीचा स्वॅग बघितला का?

Ms Dhoni Hookah : कॅप्टन कुलनं वातावरण तापवलं! काळा सूट, लांब केस, हातात हुक्का... धोनीचा स्वॅग बघितला का?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 07, 2024 11:19 AM IST

Ms Dhoni Smoking Hookah : व्हायरल व्हिडिओमध्ये एम एस धोनीच्या तोंडातून धूर निघताना दिसत आहे. धोनी हुक्का पिताना दिसत आहे.

Ms Dhoni Smoking Hookah
Ms Dhoni Smoking Hookah

Ms Dhoni Smoking Hookah : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी निवृत्तीनंतरही प्रचंड चर्चेत असतो. याचे कारण म्हणजे त्याची फॅन फॅन फॉलोइंग. धोनी काय करतो आणि काय नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांसह सर्वांनाच असते. अशातच आता सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, या व्हिडीओची प्रचंड चर्चाही रंगली आहे.

वास्तविक, या व्हायरल व्हिडिओमध्ये एम एस धोनीच्या तोंडातून धूर निघताना दिसत आहे. धोनी हुक्का ओढताना ((MS Dhoni With Hookah)) दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?

एमएस धोनी एका पार्टीत दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. माहीचे लांबसडक केसही त्याला खूपच शोभून दिसत आहेत. व्हिडिओमध्ये धोनी काही लोकांसोबत उभा राहून बोलत आहे. त्याच्या हातात हुक्का पाइपही दिसतोय. व्हिडिओमध्ये धोनी हुक्का ओढताना आणि तोंडातून धूर सोडतानाही दिसत आहे.

पण धोनीच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ पाहून काही चाहते त्याच्यावर टीका करत आहेत. तर माहीचे चाहते त्याच्या बचावातही उतरले आहेत.

धोनीला हुक्का ओढायला आवडतो- जॉर्ज बेली

दरम्यान, दिग्गज खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली याने काही वर्षांपूर्वी खुलासा केला होता की, धोनी युवा खेळाडूंसोबतचे संबंध सुधारण्यासाठी कधी कधी हुक्का ओढतो. माहीला हुक्का ओढायला आवडतो, असे बेलीने सांगितले होते.

जॉर्ज बेली एमएस धोनीसोबत आयपीएलमध्ये खेळला आहे. २००९ आणि २०१२ मध्ये बेली चेन्नई सुपर किंग्ज आणि २०१६ मध्ये तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सशी संबंधित होता.

धोनी आयपीएल २०२४ दिसणार

दरम्यान, एम एस धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनी आयपीएलच्या आगामी मोसमात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

धोनीने आयपीएलमध्ये ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. धोनीने २५० सामने खेळले आहेत. या काळात धोनीने ५०८२ धावा केल्या आहेत. धोनीने या फॉरमॅटमध्ये २४ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

WhatsApp channel