MS Dhoni Viral Video : धोनीच्या या व्हिडीओची तुफान चर्चा, स्टाइलीश बाईकवर दिसला कुल अंदाज, एकदा पाहाच!-ms dhoni seen riding a bike in ranchi ipl 2025 chennai super kings ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni Viral Video : धोनीच्या या व्हिडीओची तुफान चर्चा, स्टाइलीश बाईकवर दिसला कुल अंदाज, एकदा पाहाच!

MS Dhoni Viral Video : धोनीच्या या व्हिडीओची तुफान चर्चा, स्टाइलीश बाईकवर दिसला कुल अंदाज, एकदा पाहाच!

Sep 28, 2024 04:29 PM IST

MS Dhoni Viral Video : आयपीएल २०२४ पासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. सध्या तो सुट्टीचा आनंद घेत आहे. अमेरिकेहून परतल्यानंतर धोनी त्याच्या फार्म हाऊसवर बाईक चालवताना दिसला

MS Dhoni Viral Video : धोनीचा नवा व्हिडीओ तुफान व्हायरल, स्टाइलीश बाईकवर दिसला कुल अंदाज, एकदा पाहाच!
MS Dhoni Viral Video : धोनीचा नवा व्हिडीओ तुफान व्हायरल, स्टाइलीश बाईकवर दिसला कुल अंदाज, एकदा पाहाच!

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भले सोशल मीडियापासून दूर असेल, पण त्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर सतत व्हायरल होत असतात. आपल्या कूल आणि स्टायलिश लूकसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीचा एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये माही स्टायलिश बाईकवर फेर फटका मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्याच्या रांची येथील फार्म हाऊसचा आहे.

IPL २०२४ पासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. सध्या तो सुट्टीचा आनंद घेत आहे. अमेरिकेहून परतल्यानंतर धोनी त्याच्या फार्म हाऊसवर बाईक चालवताना दिसला. काही चाहत्यांनी धोनीला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. धोनी लांब केसांच्या लूकमध्ये बाइक चालवताना दिसत आहे. धोनीचे बाइक्सवरचे प्रेम कोणापासूनही लपलेले नाही. त्याच्याकडे एकापेक्षा एक अलीशान दुचाकी आहेत.

धोनी आयपीएल २०२५ मध्ये दिसू शकतो

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये खेळताना दिसू शकतो. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. CSK त्याला कायम ठेवणार की नाही, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहेत.

आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडले होते. अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाड याला फ्रँचायझीकडून सीएसकेचा नवा कर्णधार बनवण्यात आले.

धोनीचे क्रिकेट करिअर

महेंद्रसिंह धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. सोबतच धोनीने ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय माहीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.

यानंतर २०११ चा एकदिवसीय विश्वचषकही जिंकला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारत कसोटी फॉर्मेटमध्ये नंबर-वन बनला. धोनीने वनडे, कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्ये अनुक्रमे ४८७६, १०७७३ आणि १६१७ धावा केल्या आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये माहीचा सर्वोत्तम स्कोअर २२४, १८३ आणि ५६ धावा आहे.

धोनीने IPL च्या २६४ सामन्यांमध्ये ३९.१३ च्या सरासरीने आणि १३७.५४ च्या स्ट्राईक रेटने ५२४३ धावा केल्या आहेत. या यष्टीरक्षक फलंदाजाची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये गणना केली जाते.

Whats_app_banner