MS Dhoni : धोनीनं रूम पार्टनरसाठी एक महिना चिकन खाणं सोडलं, कारण काय? दिग्गज खेळाडूनं सांगितला भन्नाट किस्सा-ms dhoni sacrificed chicken for a one month for his roommate aakash chopra revealed ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : धोनीनं रूम पार्टनरसाठी एक महिना चिकन खाणं सोडलं, कारण काय? दिग्गज खेळाडूनं सांगितला भन्नाट किस्सा

MS Dhoni : धोनीनं रूम पार्टनरसाठी एक महिना चिकन खाणं सोडलं, कारण काय? दिग्गज खेळाडूनं सांगितला भन्नाट किस्सा

Sep 16, 2024 08:31 PM IST

Aakash Chopra On MS Dhoni : आकाश चोप्रा टीम इंडियाचा माजी सलामीवीर आहे. तो ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दौऱ्यावर वीरेंद्र सेहवागचा सलामीचा जोडीदार होता.

धोनीनं रूम पार्टनरसाठी एक महिना चिकन खाणं सोडलं, कारण काय? भारताच्या सलामीवीरानं सांगितला भन्नाट किस्सा
धोनीनं रूम पार्टनरसाठी एक महिना चिकन खाणं सोडलं, कारण काय? भारताच्या सलामीवीरानं सांगितला भन्नाट किस्सा

प्रसिद्ध हिंदी कॉमेंटेटर आकाश चोप्रा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आकाशने एका पॉडकास्टमध्ये टीम इंडिया आणि खेळाडूंबाबत अनेक खुलासे केले आहेत. या पॉडकास्टमध्ये त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही एक किस्सा सांगितला आहे. विशेष म्हणजे हा किस्सा कधीही न ऐकलेला आहे. 

आकाश चोप्रा टीम इंडियाचा माजी सलामीवीर आहे. तो ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दौऱ्यावर वीरेंद्र सेहवागचा सलामीचा जोडीदार होता.

आकाशने दिल्लीकडून उत्कृष्ट कामगिरी केली आणि निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याने २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून पदार्पण केले. आकाशने भारतासाठी एकूण १० कसोटी सामने खेळले, पण त्यानंतर त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले.

आकाशने कधीही धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही, परंतु असे असूनही तो माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचा सहकारी होता. धोनीसोबत आकाश देशांतर्गत स्पर्धेत भारत अ संघाकडून खेळला आहे.

आकाश चोप्राने एमएस धोनीबद्दल एक न ऐकलेला किस्सा सांगितला. त्याने सांगितले की धोनी त्याचा एक्स-रूम पार्टनर होता आणि त्याच्यासाठी त्याने चक्क एका महिन्यासाठी चिकन सोडले होते.

आकाश चोप्रा काय म्हणाला?

वास्तविक, राज शामानी याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, त्याचा फोन नेहमीच वाजतो, पण तो कधीच उचलत नाही. जेव्हा मी त्याला विचारले की तो किती वाजता झोपतो, कारण वेळ ठरवणे महत्वाचे आहे. पण तो म्हणाला तुला जेव्हा वाटेल लाईट बंद कर.

यानंतर धोनीबद्दल आकाश पुढे म्हणाला की, तो चिकन खातो आणि मी शाकाहारी आहे, त्यामुळे आपली जोडी काही जमणार नाही. पण, मी त्याला म्हणालो की, तुला जे खायचे आहे ते खाऊ शकतोस. यावर धोनी म्हणाला तुला जे ऑर्डर करायचे आहे ते कर.कारण  रूम सर्व्हिसला कॉल करायला तो लाजत होता. अशा स्थितीत त्याने महिनाभर शाकाहारी भोजन केले.

धोनीने २००४ मध्ये बांगलादेशविरुद्ध भारतीय संघात पदार्पण केले होते. वर्षभरानंतर त्याने कसोटी पदार्पण केले. ऑक्टोबर २००४ मध्ये आकाशने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.

Whats_app_banner