भारतीय क्रिकेटमध्ये ७ या अंकाला खूप महत्वा आहे. सात नंबर हा क्रिकेटमधील एक प्रतिष्ठित क्रमांक बनला आहे. कारण ७ हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन एम एस धोनीच्या जर्सीचा नंबर आहे.
बीसीसीआयने भारतीय क्रिकेटमध्ये ७ नंबरची जर्सी यापुढे कोणत्याही खेळाडूला न देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने सचिन तेंडुलकरचा जर्सी नंबर १० आणि धोनीचा जर्सी नंबर ७ हा भारतीय क्रिकेटमधून रिटायर्ड केला आहे.
दरम्यान, धोनीने नुकत्याच एका कार्यक्रमात त्याच्या जर्सी क्रमांकामागील स्टोरी सांगितली आहे. जर्सी क्रमांकाच्या प्रश्नावर धोनीने मजेशीर उत्तर दिले. विशेष म्हणजे, धोनीच्या काही चाहत्यांनी ७ या नंबरवरुन ‘थाला फॉर द रीजन’ हा ट्रेंड चालवला होता.
कार्यक्रमात धोनी म्हणाला, की माझा जन्म ७ जुलैचा आहे. म्हणजे जुलै हा वर्षातील सातवा महिना आहे. तारीख आणि महिना दोन्ही ७ आहे. तसेच, माझा जन्म १९८१ ला झाला. यातही ८-१ म्हणजे ७ होते.
यामुळे मला जेव्हा विचारण्यात आले की, तुला जर्सी नंबर कोणता हवा आहे? तेव्हा मला तो सांगणे खूप सोपे होते.
धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनी आयपीएलच्या आगामी मोसमात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
धोनीने आयपीएलमध्ये ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. धोनीने २५० सामने खेळले आहेत. या काळात धोनीने ५०८२ धावा केल्या आहेत. धोनीने या फॉरमॅटमध्ये २४ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.