मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  लांब केस आणि जबरदस्त फिटनेस, धोनी आयपीएल २०२४ मध्ये जुन्या लूकमध्ये दिसणार; फोटो व्हायरल

लांब केस आणि जबरदस्त फिटनेस, धोनी आयपीएल २०२४ मध्ये जुन्या लूकमध्ये दिसणार; फोटो व्हायरल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 05, 2024 10:51 AM IST

MS Dhoni Viral Photo : धोनी टेनिस कोर्टवर आपली जादू दाखवत आहे. सोबतच, या फोटोत धोनीचा उत्कृष्ट फिटनेस स्पष्टपणे दिसून येतो आहे.

MS Dhoni Viral Photo
MS Dhoni Viral Photo

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक नवा फोटो समोर आला आहे. धोनी या फोटोत आपल्या जुन्या लुकमध्ये दिसत आहे. हा फोटो आता चांगलाच व्हायरल झाला असून त्याचे चाहते या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहे.

धोनीच्या व्हायरल झालेल्या फोटोत तो टेनिस कोर्टवर आपली जादू दाखवत आहे. सोबतच, या फोटोत धोनीचा उत्कृष्ट फिटनेस स्पष्टपणे दिसून येतो आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला त्याच्या जुन्या लूकमध्ये पाहून चाहते खूप खूश आहेत.

धोनी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला होता, तेव्हा त्याचा लुका असा होता. लांब केस आणि जबरदस्त फिटनेस असलेला धोनी तेव्हापासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

दरम्यान, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. माही फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करूनही धोनीची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. ती आणखी वाढली आहे. धोनी हा जगातील सर्वाधिक फॅन फॉलोइंग असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

धोनी आयपीएल २०२४ दिसणार

धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनी आयपीएलच्या आगामी मोसमात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

धोनीने आयपीएलमध्ये ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. धोनीने २५० सामने खेळले आहेत. या काळात धोनीने ५०८२ धावा केल्या आहेत. धोनीने या फॉरमॅटमध्ये २४ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

धोनीचे IPL २००८ मध्ये पदार्पण केले होते. त्यामध्ये त्याने १६ सामने खेळले आणि ४१४ धावा केल्या. आयपीएलच्या पहिल्या मोसमात त्याने २ अर्धशतके झळकावली होती.

WhatsApp channel