MS Dhoni : वानखेडे स्टेडियमवर धोनीच्या हातात पुन्हा आली वर्ल्डकप ट्रॉफी… १३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : वानखेडे स्टेडियमवर धोनीच्या हातात पुन्हा आली वर्ल्डकप ट्रॉफी… १३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या, पाहा

MS Dhoni : वानखेडे स्टेडियमवर धोनीच्या हातात पुन्हा आली वर्ल्डकप ट्रॉफी… १३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या, पाहा

Published Apr 14, 2024 07:40 PM IST

MS Dhoni World cup trophy : धोनीचा ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवरील शेवटचा सामना असू शकतो, कारण या आयपीएलनंतर धोनी निवृत्ती घेईल, असे बोलले जात आहे.

MS Dhoni : धोनीच्या हातात पुन्हा आला वर्ल्डकप, वानखेडे स्टेडियमवरील १३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या
MS Dhoni : धोनीच्या हातात पुन्हा आला वर्ल्डकप, वानखेडे स्टेडियमवरील १३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या (PTI)

MS Dhoni IPL 2024 : आयपीएल २०२४ चा २९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज सायंकाळी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

विशेष म्हणजे, एस एस धोनीचा हा ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवरील शेवटचा सामना असू शकतो, कारण या आयपीएलनंतर धोनी निवृत्ती घेईल, असे बोलले जात आहे. अशातच आता BCCI नेही धोनीचे वानखेडे स्टेडियवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

वास्तविक, टीम इंडियाने २८ वर्षांची प्रतिक्षा याच वानखेडे स्टेडियमवर संपवली होती. जेव्हा धोनीच्या नेतृत्वात भारताने २०११ चा वर्ल्डकप जिंकला होता. १३ वर्षांआधी म्हणजेच २ एप्रिल २०११ च्या ऐतिहासिक रात्री धोनीने एक षटकार ठोकला, हा षटकार सर्वांच्या मनात आणि डोळ्यात आजही ताजा आहे आणि चाहते तो षटकार कधीच विसरू शकणार नाही.

महेंद्रसिंह धोनीने लाँग ऑन बाऊंड्रीवर मारलेल्या या ऐतिहासिक षटकारानंतर भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. यानंतर आता १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा धोनीच्या हातात वर्ल्डकप ट्रॉफी पाहायला मिळाली आहे.

२०११ च्या विश्वचषक स्पर्धेत एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आपल्याच भूमीवर जेतेपद पटकावून इतिहास रचला होता. १९८३ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर भारताला २८ वर्षानंतर दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात यश आले. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला आणि विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान देश ठरला.

ट्रॉफीकडे पाहत प्रेमानं हात फिरवला

२०११ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये धोनीने ९२ धावांची नाबाद खेळी खेळली होती आणि गौतम गंभीर (९७) सोबत दमदार भागिदारी केली होती. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराच्या चेंडूवर षटकार ठोकून धोनीने टीम इंडियाला चॅम्पियन बनवले होते. त्या विजयाच्या १३ वर्षांनंतर, धोनीच्या हातात पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफी मिळाली. आयपीएल २०२४ मधील मुंबई-सीएसके सामन्यासाठी धोनी वानखेडे स्टेडियमवर आला आहे.

चाहत्यांच्या आठवणी ताज्या झाल्या

धोनीचे वर्ल्डकप ट्रॉफीसोबतचे काही फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये धोनी ट्रॉफीवरून प्रेमाने हात फिरवताना दिसत आहे. चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत. तसेच, हे फोटो पाहून १३ वर्षांपूर्वीच्या आठवणी चाहत्यांच्या मनात ताज्या झाल्या आहेत.

धोनीचा वानखेडेवर शेवटचा सामना?

धोनीचा आजचा सामना खूप खास आहे. कारण कारण वानखेडे स्टेडियमवर व्यावसायिक क्रिकेटर म्हणून धोनीचे हे शेवटचे पाऊल असू शकते. धोनीचा हा आयपीएलमधील शेवटचे सीझन असून यानंतर तो निवृत्त होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. चेन्नईला या मोसमात वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकही सामना खेळण्याची संधी मिळणार नाही कारण प्लेऑफचे सामने चेन्नई आणि अहमदाबादमध्ये होणार आहेत. अशा स्थितीत धोनीने शेवटची भेट संस्मरणीय केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या