मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी धोनी आणि साक्षी पोहोचले या देशात? क्रिती सेननही सोबत, पाहा

MS Dhoni : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी धोनी आणि साक्षी पोहोचले या देशात? क्रिती सेननही सोबत, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 31, 2023 05:57 PM IST

ms dhoni new year party : टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीदेखील नववर्षाच्या स्वागतासाठी दुबईला पोहोचला आहे. धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी आणि कुटुंबिय आहेत.

ms dhoni new year party in dubai
ms dhoni new year party in dubai

ms dhoni new year party in dubai : ३१ डिसेंबर म्हणजे या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्साठी अवघे काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रेटी नववर्ष साजरे करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले आहेत.

टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीदेखील नववर्षाच्या स्वागतासाठी दुबईला पोहोचला आहे. धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी आणि कुटुंबिय आहेत.

धोनीसोबत क्रिती सॅननदेखील दुबईत

दरम्यान, ३० डिसेंबरच्या रात्री धोनी हा त्याची पत्नी साक्षी आणि काही बॉलिवूड स्टार्ससोबत दुबईमध्ये पार्टी करताना दिसला. सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सॅनन आणि तिची बहीण नुपूर सॅनन देखील दिसत आहेत.

या पार्टीत नुपूर सेननचा कथित बॉयफ्रेंड आणि गायक स्टेबिन बेन आणि वरुण धवनही उपस्थित होते. या सर्वांशिवाय बिग बॉस OTT 2 फेम अब्दू रोजिक देखील दुबईतील न्यू इयर सेलिब्रेशन पार्टीत उपस्थित होता.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले

स्टेबिन बेनने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केला आहे. यात क्रिती सेनन, नुपूर सेनन आणि स्टेबिन हे एमएस धोनी आणि साक्षीसोबत पोज देताना दिसत आहेत. काळ्या शर्ट आणि काळ्या पँटमध्ये एमएस धोनी खूपच देखणा दिसत आहे. धोनीची पत्नी साक्षी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये होती.

क्रिती सेनने पार्टीसाठी ऑरेंज-वायलेट रंगाचा ड्रेस घातला होता, तर नुपूरने काळ्या आणि ब्राउन रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता. या सर्व लोकांचे धोनीसोबतचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

WhatsApp channel